शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भांबोरा येथील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:45 IST

घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धडक दिली. त्यांनी शिक्षकावरील प्रस्तावित कारवाईचा विरोध केला.

ठळक मुद्देशिक्षकावर कारवाईला विरोध : पालकांमध्ये दोन मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धडक दिली. त्यांनी शिक्षकावरील प्रस्तावित कारवाईचा विरोध केला.भांबोरा येथील विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. २६ जानेवारीला मुख्याध्यापक अशोक मोहुर्ले यांनी गावकऱ्यांसमक्ष सरपंच व सचिवांकडे १४ व्या वित्त आयोगातील निधीची मागणी केली. वित्त आयोगाच्या निधीत शिक्षणावरील खर्चाची तरतूद आहे. त्याच दिवशी आयोजित ग्रामसभेत पालकांनीही निधीबाबत विचारणा केली. त्यावर सरपंच व सचिव निरुत्तर झाले. त्यानंतर आठ दिवसांनी मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार झाली. मात्र ही तक्रार बिनबुडाची असल्याचा आरोप निवेदनकर्त्या नागरिकांनी निवेदनातून केला.दरम्यान, याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकावर कारवाईसाठी विद्यार्थी व पालकांनी यवतमाळात आंदोलन सुरू केले. मुख्याध्यापकावर बदली व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र केवळ एक-दोन पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकावर कारवाई करू नये, त्यांना तेथेच कायम ठेवावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी सीईओंकडे केली आहे. यावेळी अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीMorchaमोर्चा