शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची हजेरी अ‍ॅपवर

By admin | Updated: January 1, 2017 02:18 IST

शाळांमध्ये विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे.

जिल्हा परिषद सज्ज : आठवडाभरात सुरू होणार अंमलबजावणी
अविनाश साबापुरे यवतमाळ
शाळांमध्ये विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती यापुढे मोबाईल अ‍ॅपवर नोंदविण्यात येणार आहे. शनिवारी यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी सीईओंकडे मंजुरीसाठी पाठविला.
स्थलांतर आणि अन्य कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविणे जिकिरीचे झाले आहे. यावर प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपचा उतारा शोधला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. आता शिक्षण विभागाने एलआयसीच्या माध्यमातून ‘डेली अटेंडन्स’ हा अधिकृत अ‍ॅप तयार केला आहे. सोमवारी २ जानेवारीपासूनच या अ‍ॅपवर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याचे शासनाचे नियोजन आहे. परंतु यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षकांना पुरेसा वेळ देऊन आठवडाभरात याची अंमलबजावणी सुरू करेल, असे संकेत आहेत.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची रेंज पोहोचलेली नाही. चालू शैक्षणिक सत्रापासून शासनाने सक्तीचा केलेला पोषण आहाराचा एमडीएम अ‍ॅपही अनेक शिक्षक दररोज अपडेट करू शकलेले नाही. त्यातच आता दैनंदिन हजेरी मोबाईल अ‍ॅपवर नोंदविताना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. प्रत्येक वर्गशिक्षकाला या अ‍ॅपमध्ये आपला मोबाईल क्रमांक अधिकृतपणे रजिस्टर्ड करूनच आपापल्या वर्गाची हजेरी नोंदवावी लागणार आहे. परंतु एखाद्या शाळेच्या ठिकाणी दिवसभर रेंज नसल्यास हजेरी कशी आणि केव्हा नोंदवावी, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या प्रस्तावाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यावरच या मोबाईल हजेरीच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित होणार आहे.

सोमवारचा सेल्फी गुलदस्त्यात
विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षकांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी फोटो घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. जानेवारीच्या पहिल्या सोमवारीच त्याची अंमलबजावणी सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु आॅक्टोबर महिन्यातील या आदेशावर शिक्षकांनी रान उठविले होते. त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. शिक्षण विभाग आणि शिक्षक या मुद्यावर गप्प आहे. आदेशानुसार सोमवारी २ जानेवारीला शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढणार का, हा मुद्दा सध्या गुलदस्त्यात आहे.