शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी असुरक्षितच; कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही भौतिक सुविधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:44 IST

Yavatmal : रिक्त पदे भरण्याबाबत शासनाची उदासीनता

जब्बार चीनी लोकमत न्यूज नेटवर्क वणी: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबर तळागाळातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. नवीन शाळा खोल्यांची उभारणी, शाळा दुरुस्ती, शौचालयांची उभारणी, दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे यासह मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण विभाग कोट्यवधी रुपयाचा खर्च या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी करत असते. मात्र त्यानंतरही विद्यार्थी असुरक्षितच आहेत.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३८ तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या दोन शाळा आहेत. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वणी तालुक्यातील ३४ शाळांमध्ये नवीन ४५ वर्गखोली बांधकाम, ५९ शाळेला संरक्षण भिंत, १०३ शाळेत आरओ प्लांन्ट, ८४ शाळेत डेस्क बेंच, २९ शाळेत नवीन शौचालय, तर सात शाळेत शौचालय दूरस्तीची आवश्यकता आहे. शिक्षण विभाग कोट्यवधी रुपयाचा खर्च या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी करत असते. मात्र त्यानंतरही विद्यार्थी असुरक्षितच आहेत. वास्तविक, दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असताना गेल्या काही महिन्यांपासून रिक्त पदे भरण्याबाबत शासनाची उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे या विभागांवर कामाचा ताण येत आहे. दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अनेक पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे लवकर भरल्यास शिक्षण विभागावरील कामाचा ताण कमी येऊ शकतो. पंचायत समितीमार्फत रिक्त पदांबाबत वारंवार शासनाला माहिती कळवली जाते. तरीही शासनाची त्याकडे डोळेझाक होत आहे.

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर सन २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती केली नाही. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे. शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष दिले तरच ग्रामीण भागातील शाळा टिकतील.

चित्रकलेसाठी कला शिक्षकच नाही शासनाने पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवीपर्यंतही चित्रकला विषय अनिवार्य केला आहे. मात्र, चित्रकलेसाठी कला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सन २०१३ पासून शासनाने कला शिक्षकांची भरती बंद केली आहे. एकीकडे एटीडीचे शिक्षण चालू असून दुसरीकडे कल क्षेत्रातील पदभरती बंद केल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. चित्रकला विषयासाठी शिक्षकांची गरज आहे.

पालकांची विचारसरणी व मानसिकता बदलली पूर्वी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाचा आत्मा म्हणून ओळखला जायचा. पण त्याच जिल्हा परिषदेच्या शाळावर आजचा घडीला शेवटची घटका मोजण्याची वेळ आली आहे. याला मुख्य कारण म्हणजे पालकांची बदललेली विचारसरणी. कारण प्रत्येक पालकांना आपले पाल्य इंग्रजी मीडियमच्या शाळेत पैसे खर्च शिकवायचे असते.

वणी तालुक्यात शिक्षकांची ८४ पदे रिक्त वणी तालुक्यात शिक्षकांची ४४५ पदे मंजूर आहेत. त्यातील ८४ पदे रिक्त आहे. सध्या प्रभारी कारभार चालू आहे. शिक्षण विस्तार अधिकारी सहा पदे मंजूर आहेत. पैकी चार रिक्त आहे, दोन कार्यरत आहेत. केंद्रप्रमुख १४ पदे असून हे सर्वच पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळzp schoolजिल्हा परिषद शाळा