शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 17:54 IST

बारावी विज्ञानसाठी संधी : शिक्षण मंडळाने परीक्षा पद्धतीत केला बदल

विनोद ताजनेवणी (यवतमाळ) : ज्यांना मराठी लिहिता-वाचता येते, अशा बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीतून शिकता येत असले, तरी उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी यावर्षीपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. तसे परिपत्रक सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे आवेदनपत्र भरण्याच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रमुख विषयासह 65 विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांची इच्छा असल्यास विषयाची बारावीची परीक्षा मराठीतून देण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी बारावीचा प्रवेश अर्ज भरताना या विषयांपुढे उत्तराची भाषा मराठी, असा उल्लेख 02 हा सांकेतांक निवडून करावयाचा आहे. त्यांना प्रश्नपत्रिकेत त्या-त्या विषयातील जे शास्त्रीय तांत्रिक मराठी शब्द असतात, त्यांच्यासोबत कंसात त्या शब्दाचे इंग्लिश प्रतिशब्द दिले जाणार आहे. उत्तरे लिहिताना विद्यार्थ्याला एखादी मराठी शास्त्रीय, तांत्रिक संज्ञा किंवा मराठी शब्द त्यावेळी आठवला नाही, तर विद्यार्थी मराठी वाक्यात इंग्रजी तांत्रिक संज्ञा लिहू शकतील. मराठी भाषिक विद्यार्थ्याला मराठीतील खोच, पेच, मर्म, तिढा, फिरकी लवकर जाणवते व त्या प्रश्नाचे अधिक, अचूक व अधिक सविस्तर उत्तर लिहून विद्यार्थी त्या विषयात अधिक गुण मिळवू शकतात, असा शिक्षण मंडळाचा तर्क आहे.

शिक्षण मंडळाचा सामान्य गणिताचा प्रयोग फसलायापूर्वी राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या गणितात कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचलित गणिताऐवजी सामान्य गणित, हा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी या प्रयोगाला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता शिक्षण मंडळाने सामान्य गणित हा विषयच बंद केला आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या या मराठीकरणाच्या प्रयोगालाही विद्यार्थी प्रतिसाद देतील की नाही, हे आवेदनपत्र भरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाmarathiमराठीenglishइंग्रजी