शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:34 IST

सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.

ठळक मुद्देमोठे नुकसान । पिंपळाचे झाड कोसळले, तीन बालके जखमी, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले.वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. येथील पशुवैद्यकीय कार्यालयाजवळील ताजनगरमधील जुने मोठे पिंपळाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. हे झाड नासीर खान गफ्फार खान यांच्या घरावर कोसळले. यामुळे खान परिवार हादरून गेला. झाड घरावर कोसळल्याने ७ वर्षीय आनम फिरदोस, ५ वर्षीय नूरजहाँ आणि ६ वर्षीय सुलतान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नासीर खान, समशादबी, आयेशा अंजुम, बिलाल हे किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाड घरावर पडल्याने घराच्या भिंती, टिनपत्रे व घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील देऊरवाडी (पु.) येथील शारूक शे.महेमूद यांच्यासह ८ ते १० जणांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. चिंचोली, कळसा, सावंगा बु, धानोरा, निंभा, विठोली, तुपटाकळी, कांदळी, महागाव, कलगाव, डेहणी, चिरकुटा, फुलवाडी, आरंभी, मोख, तिवरी, लाख रायाजी, साखरा, हरसूल, गांधीनगर, मांडवा, रोहणादेवी, आमला, खंडापूर, रामनगर, इसापूर, दत्तापूर, कोलुरा, साखरी, फेट्रीसह अनेक गावांत घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.येथील जुन्या बसस्थानकावरील मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिनबाई विद्यालयातील निंबाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिवाणी न्यायालयातील निंब, डॉ.आंबेडकर पुतळा परिसरातील निंबाचे झाड उन्मळून पडले. तहसील व पंचायत समिती परिसरात झाडे तुटली. यामुणे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल प्रशासनाला पंचनाम्याचे आदेशतहसीलदार राजेश वझीरे यांनी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महसूलचे खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामे करीत आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतरच वादळाने झालेल्या नुकसानीचा खरा आकडा कळणार आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे मात्र नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊस