आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:32 PM2018-11-13T22:32:46+5:302018-11-13T22:34:08+5:30

तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Strike in Arni tehsil | आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या

आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या

Next
ठळक मुद्देशेतकरी वंचित : पॉवरग्रीडच्या टॉवरचा मोबदला देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वेळेत मोबदला न दिल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला.
पॉवरग्रीड लाईनचे टॉवर शेतातून गेले. यामध्ये बरीच शेतजमीन अनधिकृतरित्या अधिग्रहीत केली. मोबदला मागितला असता भूमिअभिलेख कार्यालयात शेतीची नोंद नसल्याचे कारण पुढे केले. सावळी सदोबा येथील शेतकºयांची बोळवण करण्यात आली. थोडीबहुत शेतजमीन असताना त्यातील बराचसा भाग टॉवरमध्ये गेला. वहितीसाठी कमी जमीन शिल्लक राहिली. पिढीजात शेतकरी असलेल्या कुटुंबांचे यात नुकसान झाले.
प्रहारचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, तालुकाध्यक्ष अंकुश राजूरकर, शहर प्रमुख श्रीकांत काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी तहसीलवर धडकले. जमिनीची नोंद करून मोबदल्याची मागणी केली. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर येण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला. त्यानंतर तहसीलदार संदीप भस्के यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: Strike in Arni tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.