शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

शेती हडपणारे टोळके अटकेत

By admin | Updated: March 19, 2015 02:13 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्रीपत्र तयार करून शिरपूर येथील वृध्द शेतकरी संभा विठू शिखरे यांची शेती हडपणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे.

वणी : बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्रीपत्र तयार करून शिरपूर येथील वृध्द शेतकरी संभा विठू शिखरे यांची शेती हडपणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही सूत्रधार आहेत का, याची पोलीस तपासणी करीत आहे. तालुक्यातील चारगाव येथील संभा शिखरे यांच्या मालकीचे गाव नं. १०३ येथील गट नं. ३४/३, क्षेत्रफळ १.९७ हेक्टर+०.२४ हेक्टर पोट खराब, आकार रूपये ६.००, भोगवटदार वर्ग एक ही शेत जमीन आहे. ११ मार्चला संभा शिखरे नातेवाईक मारोती धोंडू शिखरे यांच्यासोबत चारगावचे तलाठी करमनकर यांच्याकडे पोहोचले. त्यांनी आपल्या शेताच्या नकाशाची मागणी केली. त्यावेळी तलाठ्याने सदर शेताच्या फेरफाराकरिता विक्रीपत्र त्यांच्याकडे दाखल झाल्याचे संभा यांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. प्रत्यक्षात संभा यांनी शेत कुणालाच विकले नव्हते. शिखरे यांनी त्या विक्रीपत्राची झेरॉक्स घेत येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून त्याची प्रमाणित नक्कल काढली. त्यात प्रवीण यादव भोंगळे रा.इजासन, जि.चंद्रपूर, पंढरी राघोबा नागपुरे रा.वणी आणि विजय बापूराव चिकटे रा.जुनी वस्ती कोंढा, जि.चंद्रपूर या तिघांनी संगनमत करून दुसऱ्या अनोळखी इसमास संभा शिखरे यांच्या नावावर उभे करून शेत खरेदी केल्याचे आढळून आले. दुय्यम निबंधक कार्यालयात २९ डिसेंबर २0१४ रोजी त्याची नोंदणी करण्यात आली. मात्र शिखरे हे कधीही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदण्याकरिता गेलेच नव्हते. संभा यांच्या जागी दुसरा वृद्ध शेतकरी उभा करून प्रवीण भोंगळे याने शेताची खरेदी आपल्या नावाने करवून घेतल्याचे निष्पन्न झाले होते. सोबतच शिखरे यांच्याकडे केवळ चारगाव येथेच शेत जमीन असून विक्रीपत्राला डोंगरगाव (शी.) ता.वरोरा येथील शेत गट नं. १८ चा सातबारा जोडण्यात आला आहे. तो सातबारा गणपत बालाजी अवगाहणे यांच्या नावाने असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शिखरे यांचे खोटे मतदान ओळखपत्रसुद्धा दस्ताला जोडण्यात आले. त्यावर अनोळखी व्यक्तीच्या अंगठ्याचे ठसेही आहे. दुय्यक निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून भोंगळे याने शेत हडपण्याचा डाव आखला. बनावट विक्रीपत्राच्या आधारेच त्याने फेरफाराकरिता दस्तऐवज दाखल केले होते. या सर्व प्रकारानंतर शिखरे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी भादंवि ४२0, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. शिरपूरचे ठाणेदार मनोज केदारे यांनी तातडीने सूत्रे हलवून या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण यादव भोंगळे रा.विजासन, ता.भद्रावती, जि.चंद्रपूर, विजय बापूराव चिकटे रा.जुनी वस्ती कोंडा ता.भद्रावती, जि.चंद्रपूर, सुधाकर सदाशिव कुलथे रा.विजासन, ता.भद्रावती, जि.चंद्रपूर आणि इलीयास वहाब पटेल रा.अरविंदनगर, मूल रोड चंद्रपूर यांचा समाावेश आहे. या चौघांकडून आता बरीच प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई केल्याने हे चौघे गळाला लागले. ही कारवाई सुदर्शन वानोळे, वासुदेव नारनवरे, राजू बागेश्वर, योगेश ढाले, उल्हास कुरकुटे, विनोद नागरगोजे यांनी पार पाडली. (कार्यालय प्रतिनिधी)