शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 9:52 PM

मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : दारव्हा येथे राज्यस्तरीय मराठा-कुणबी परिचय मेळावा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.सहकार महर्षी माजी आमदार बाळासाहेब घुईखेडकर जयंती महोत्सवानिमित्त सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतीक मंडळातर्फे येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात राज्यस्तरीय मराठा-कुणबी समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. त्यांनी ओबीसीतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर वसतिगृहाची आवश्यकता असून त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिलांनी आयोजित केलेला राज्यातील पहिला मेळावा असून याची ‘लोकमत’ने दखल घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.खासदार भावना गवळी यांनी समाजाला बलशाली बनविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे काळजी गरज असल्याचे सांगितले. कठीण लढाईतही केवळ समाजाच्या भक्कम पाठींब्यामुळे निवडणुकीत विजय मिळविल्याचे मत खासदार मधुकरराव कुकडे यांनी व्यक्त केले. प्रथम खासदार भावना गवळी यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. मंचावर माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विजयाताई धोटे, सुशीलाताई पाटील, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, वाशीम जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जीवन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, उत्तमराव शेळके, सुभाष ठोकळ, मनीष पाटील, नानाभाऊ गाडबैले, तातू देशमुख, अशोक बोबडे, अरुण राऊत, राजेंद्र पाटील, पुष्पा नागपुरे,राम देवसरकर उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख, बाळासाहेब घुईखेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने मेळाव्याला सुरुवात झाली. वसंतराव घुईखेडकर, राजाभाऊ ठाकरे आदींनी विचार व्यक्त केले.संचालन प्रगती आखरे, प्रास्ताविक मुख्य आयोजक डॉ.संगीता घुईखेडकर, तर आभार डॉ.कांचन नरवडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतीक मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.दोनशेच्यावर उपवर-वधूंनी दिला परिचयमेळाव्यात समाजातील दोनशेच्यावर उपवर-वधूंनी परिचय दिला. नवनिर्वाचित खासदार मधुकरराव कुकडे, वसंतराव घुईखेडकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.सुनील चकवे, डॉ. संतोष चतुर यांनी तयार केलेल्या परिचय पुस्तिकेचे प्रकाश्न करण्यात आले.

टॅग्स :Manikrao Thakareमाणिकराव ठाकरेmarathaमराठा