शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुसदच्या पाणीटंचाईवर वादळ

By admin | Updated: April 2, 2017 00:27 IST

पंचायत समितीची वार्षिक आमसभा पाणीटंचाई, घरकूल योजनेतील अपहार, जलयुक्त शिवारची बोगस कामे,

पंचायत समिती आमसभा : जलयुक्त शिवारच्या बोगस कामांवर आक्षेप पुसद : पंचायत समितीची वार्षिक आमसभा पाणीटंचाई, घरकूल योजनेतील अपहार, जलयुक्त शिवारची बोगस कामे, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी, अधिकाऱ्यांची दांडी, भ्रष्टाचाराचे आरोप यावरून वादळी ठरली. कोणतीही ठोस उपाययोजना किंवा कार्यवाही न करता परस्परविरोधी आरोपातच सभेचे सूप वाजले. पुसद तालुक्यातील ग्रामीण जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, सर्वांना सुविधा मिळाव्या यासाठी दरवर्षी पुसद पंचायत समितीमध्ये आमसभा घेतली जाते. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि सरपंच आदींचा समावेश असतो. ३१ मार्च रोजी पंचायत समितीच्यावतीने आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. पंचायत समिती सभापती देवबा मस्के, उपसभापती गणेश पागिरे, जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, बाळा पाटील, रंजना पंडित घाडगे, विमल आडे, साहेबराव धबाले, गजानन उघडे, भोलेनाथ कांबळे, ज्योती चिरमाडे, पंचायत समिती सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. या आमसभेत विश्वास भवरे, सुधाकर कांबळे, नारायण पुलाते, डॉ.राठोड यांनी समस्या मांडल्या. आमसभेची नोटीस ही आठ दिवसांपूर्वी मिळायला पाहिजे. पण केवळ एक दिवसापूर्वी सभेची नोटीस दिली जाते. तसेच आमसभेत समस्यांचे कधीही निराकरण होत नाही. चर्चा केवळ सभेपुरतीच होते. नंतर त्यावर कोणतीही चर्चासुद्धा होत नाही. गटविकास अधिकाऱ्यांवर तीव्र आक्षेप उठवित त्यांच्या कार्यप्रणालीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय योजनेची माहिती अधिकाऱ्यांनाच नाही, असाही आरोप करण्यात आला. जलयुक्त शिवारची कामेही निव्वळ थातूरमातूर करून अधिकारी बिले हडप करीत आहे, असा आरोप सदस्यांनी केला. एकंदरीत ही आमसभा फक्त वादळीच ठरली. यामध्ये कोणतेही ठोस असे कार्य साधले गेले नाही, अशी ओरड सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. त्यांची ही पहिलीच आमसभा असून ही सभा वादळी ठरली, हे लक्षात आल्याने नवनिर्वाचित सदस्य पुढील आमसभा नियोजनबद्ध व चांगल्यारितीने व्हावी, यासाठी प्रयत्न करतील, प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)