शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

खुनानंतर भांबराजात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागले. डिवरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. गुरुवारी रात्रीपासून भांबराजा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. राखीव पोलीस दलालाही गावात पाचारण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच गावामध्ये तणाव होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळ / हिवरी : भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती सुनील डिवरे यांची मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी सकाळीही कायम होते. संतप्त ग्रामस्थांनी पाेलीस प्रशासनाचा निषेध नोंदवित रास्ता रोको आंदोलन सुरू केले. नागपूर-बोरी-तुळजापूर हा महामार्ग ग्रामस्थांनी अडवून धरला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. तणावाची स्थिती दुपारपर्यंत कायम होती. बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागले. डिवरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. गुरुवारी रात्रीपासून भांबराजा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. राखीव पोलीस दलालाही गावात पाचारण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच गावामध्ये तणाव होता. सुरुवातीला पोलिसांना ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागले. गावच्या राजकारणातील वादातूनच सुनील डिवरे यांची हत्या झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. डिवरे यांच्या पत्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रात्री चार आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर उर्वरित तीनजण पसार झाले. त्यांनाही तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. डिवरे यांचा मृतदेह सायंकाळपर्यंत गावात पोहोचला नव्हता. दुपारी डिवरे समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

गावात तणावपूर्ण शांतता - पोलीस ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. डिवरे कुटुंबाचीही भेट घेऊन सांत्वन केले. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. गावात तणावपूर्ण शांतता होती. सुनील डिवरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावात आणण्यात आला. रात्री ८ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

टॅग्स :agitationआंदोलनPoliceपोलिस