शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोणी येथे शेतकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 22:59 IST

भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला.

ठळक मुद्देरात्रीच्या वीज पुरवठ्याचा बळी: टायर पेटविले, तीन तास वाहतूक ठप्प

आर्णी : भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. आर्णी-दारव्हा मार्गावर लोणी येथे शेतकºयांनी रस्ता रोको करून वीज वितरण कंपनीविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. रस्त्यावर टायर पेटवून तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली होती.आर्णी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. त्यातही भारनियमन दिवसा केले जात असल्याने शेतकºयांना रात्रीच ओलितासाठी जावे लागते. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोणी येथील शेतकरी संतोष विष्णू होळकर (३०) याचा रोहित्रातील विजेच्या धक्क्याने बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यामुळे गावकरी संतापले. थेट लोणीच्या बसस्थानकावर येऊन दुपारी १२ वाजता चक्काजाम सुरू केला. रस्त्यावर मोठ्ठाले टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. वीज वितरण कंपनीविरुद्ध शेतकरी रोष व्यक्त करीत होते. चक्काजामची माहिती आर्णी पोलिसांना होताच त्यांनी तत्काळ लोणी गाठले. तसेच वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चेतना मोहनकर, नायब तहसीलदार आर.बी. मांडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. संतप्त शेतकºयांशी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी ३ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकºयांनी लोणी येथील वीज कर्मचारी उर्मट वागणूक देत असल्याचा आरोप केला.रोहित्रातील विजेच्या धक्क्याने शेतकरी ठारसंतोष विष्णू होळकर याच्याकडे चार एकर शेती होती. त्याच्यावरच संपूर्ण कुटुंबाची भिस्त होती. यावर्षी त्याने आपल्या शेतात कापूस, सोयाबीन आणि हरभरा लावला होता. दिवसा भारनियमन होत असल्याने तो दररोज रात्री ओलित करण्यासाठी शेतात जात होता. शेतातील बोअरवेलवरून तो ओलित करीत होता. बोअरवेलला पाणी कमी असल्याने केवळ दोन नोझलवरच तो सिंचन करीत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुचाकीने तो गणगाव मार्गावरील शेतात गेला. रात्री त्याच्या वडिलांनी मोबाईल लावला परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. कामात असेल म्हणून वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. सकाळी ९ वाजले तरी संतोष घरी आला नाही म्हणून वडिलांनी शेत गाठले. शेतातही तो दिसत नव्हता. मात्र त्याची दुचाकी धुºयावर उभी होती. त्याचा शोध घेतला असता शेतातील रोहित्राजवळ (डीपी) त्याचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. ही माहिती गावात होताच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतोषच्या मागे पत्नी, मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.