शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

साठा संपला, कोरोना लसीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 5:00 AM

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंतसुद्धा लस जिल्ह्यात पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी ही लस येईल का याबाबत आत्ताच काही सांगता येत नसल्याचेही येडगे म्हणाले. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील  नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यापूर्वी फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक, शासकीय कर्मचारी यांचेही लसीकरण करण्यात आले.  काही नागरिकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर प्रतीक्षेची वेळ : गुरुवारी सायंकाळीही लस पोहोचल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्ह्याला गुरुवारपर्यंत पुरेल एवढाच लसींचा साठा होता. सायंकाळपर्यंत लसींचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु  प्रत्यक्षात हा पुरवठा न झाल्याने आता गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवरील कामकाज ठप्प पडणार आहे. नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंतसुद्धा लस जिल्ह्यात पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी ही लस येईल का याबाबत आत्ताच काही सांगता येत नसल्याचेही येडगे म्हणाले. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील  नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यापूर्वी फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक, शासकीय कर्मचारी यांचेही लसीकरण करण्यात आले.  काही नागरिकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. याच स्थितीत गावपातळीवर जाणीवजागृती होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लस पाठविण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाला वेग मिळाला होता. जिल्ह्यात १७८ ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्याकरिता आरोग्य विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तर काही ठिकाणी नव्याने तात्पुरती भरतीही करण्यात आली आहे. लसीकरणाची मोहीम वेगाने जात असताना लागणारी लस न मिळाल्याने सोमवारपासून त्याचा प्रभाव जाणवत होता. खासगी लसीकरण केंद्रांवर लस नसल्याने लसीकरण बंद ठेवावे लागले. त्यापाठोपाठ इतरही शासकीय केंद्रांना लस नसल्यामुळे बंद ठेवण्याची वेळ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अनेकजण लस नसल्याने परत आले. जिल्ह्यात ६१ केंद्रांवर गुरुवारी लस नव्हती. गुरुवारी सायंकाळपर्यंत लस न आल्याने सर्व १७८ केंद्र शुक्रवारी बंद करावे लागणार आहे. दोन सदस्यीय केंद्रीय चमूने येथील पाटीपुरा केंद्रावर भेट दिली. तेथील लस संपली होती. मात्र चमूच्या भेटीमुळे वेळेवर धावपळ करून लस उपलब्ध केली. 

एका ॲम्पुलमध्ये दहा जण लसीकरणासाठी मिळेना ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी पाहिजे तशी गतीच नाही. एक ॲम्पुल फोडायचे असेल तर त्याला लागणारे दहा नागरिक येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतरच ॲम्पुल फोडले जाते. यामुळे तासन्‌तास प्रतीक्षेनंतर गर्दी नसलेल्या ठिकाणी लसीकरण होते. तर काही केंद्रांवर निरंक लस दिसत असल्याने आरोग्य विभागाने जितके लोक उपलब्ध होतील, त्यांच्यासाठी लस देण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे काही प्रमाणात लसीचा डोजही वायाही गेला. 

जिल्ह्याला दिवसभर पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. नव्याने लसीची मागणी करण्यात आली आहे. सध्या लस उपलब्ध व्हायची आहे. लस आल्यानंतर लगेच वितरण करून लसीकरण प्रक्रिया सुरू होईल. लस नसल्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नाही. लस येणार आहे. - अमोल येडगे,  जिल्हाधिकारी, यवतमाळ

केंद्रनिहाय लसीकरण पांढरकवडा - ५१७६, दारव्हा - ४६७८, पुसद - ६२८२, उमरखेड - ६३८७, वणी -७८४२, राळेगाव - २००६, आर्णी - ३४८१, दिग्रस - ४२४१, कळंब - २१०४, घाटंजी - २९०६, बाभूळगाव - २१२२, नेर - ३५४७, मारेगाव - १४६०, सवना - ६४३, लोही - ६४४, झरी - ९६५, करंजी - ४७७, यवतमाळ - २८१६८,  ग्रामीणमधील एकूण ६३  प्राथमिक आरोग्य केंद्र - ४८ हजार ५७४.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस