लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. या अनोख्या आंदोलनामुळे उपोषणस्थळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी पुढाकार घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.गेल्या काही वर्षापासून मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची अतिशय दुरावस्था झाली आहे. डॉक्टर व कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे सामान्य नागरिक पुरता हतबल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तर रूग्णालयाची स्थिती अतिशय बिकटच झाली. एका कामचलाऊ डॉक्टरच्या भरवशावर ग्रामीण रूग्णालयाचा कारभार सुरू आहे.याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास १६ आॅगस्टपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार १६ आॅगस्टपासून स्थानिक जिजाऊ चौकात मनेसेचे संतोष रोगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. दरम्यान गुरूवारी शल्य चिकीत्सक धोटे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तात्पुरती एका डॉक्टरची नियुक्तीही केली. मात्र यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही. शुक्रवारी उपाषणकर्त्या रमेश सोनुले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांचा संयम सुटला. संतप्त कार्यकर्त्यांनी वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यामुळे आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता.आज मारेगाव बंदमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण रूग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला शहरातील व्यापाºयांनी पाठिंबा दर्शविला आहे. शनिवारी शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी जाहीर केला आहे.
आमदारांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:29 IST
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुतळ्याचे दहन केले.
आमदारांच्या पुतळ्याचे दहन
ठळक मुद्देग्रामीण रूग्णालयात समस्या : मारेगावात मनसेचे आंदोलन पेटले