शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई शाळांच्या प्राचार्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

शाळा प्रशासनाने पालकांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन त्रैमासिक शुल्क भरण्याची सुविधा प्रदान केली आहे. तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केली नाही. पालकांच्या सुविधेकरिता ऑनलाईन शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त काही पालकांना अडचण असेल तर ते शाळेला भेट देऊ शकतात. ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले असून कोणालाही काढण्यात आले नाही.

ठळक मुद्देआर्थिक अडचणींवर चर्चा : विविध मागण्यांचा समावेश, उपाययोजनांसह ऑनलाईन क्लासेसची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उच्च न्यायालयाचा निर्णय, शासनाचा आदेश यानुसार शैक्षणिक शुल्क व प्री-प्रायमरी ते बारावीपर्यंतचे ऑनलाईन वर्ग घेण्याच्या सूचना आहेत. परंतु सर्व काही नियमानुसार असूनही पालकांचा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे खासगी विनाअनुदानित शाळा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सीबीएसई शाळांच्या प्राचार्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २४ जुलै रोजी संयुक्त निवेदन सादर केले.निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन (आयपीएस) व जिल्हा शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना मागण्यांचे हे निवेदन सादर करण्यात आले. त्यांच्यापुढे शाळांची सद्यस्थिती, कोरोना प्रतिबंधात्मक व्यापक उपाययोजनांसह शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन सुरू असलेले क्लासेस अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.आवक बंद, खर्च प्रचंड वाढलेसर्व प्राचार्यांनी सांगितले की, आमची शाळा स्वयंअर्थसहायित (कायम विनाअनुदानित) असून शाळेचा सर्व प्रकारचा खर्च, शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज बिल, पाणी बिल, इंटरनेट शुल्क, जनरेटर व संगणक देखभाल खर्च व इतर खर्च हे सर्व पालकांकडून येणाऱ्या शैक्षणिक शुल्कावर अवलंबून आहे. शाळेजवळ आर्थिक उत्पन्नाचे अन्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने शाळेला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. इमारत भाडे, शाळेची सुरक्षा व्यवस्था, सीबीएसई आणि स्टेट अ‍ॅफिलिएशन फी, फिक्स इलेक्ट्रीक बोर्ड चार्जेस, वार्षिक देखभाल खर्च, वॉटर कुलर, एसी, संगणक, सीसीटीव्ही व इतर उपकरणे, स्कूल सॉफ्टवेअर, एएमसी चार्जेस, इंटरनेट लिज लाईन चार्जेस, विमा खर्च, ऑडिट फी, नगरपालिका व महसूलचे टॅक्स याशिवाय इतरही खर्च महागाईमुळे वाढले आहेत. तसेच यावर्षी ऑनलाईन क्लासेसमुळे इंटरनेट खर्च, वीज खर्च यासह सॅनिटायझर, संसर्ग टाळण्यासाठी फवारणी असे अनेक खर्च वाढले आहेत.खर्चाच्या तुलनेत बचत तुटपुंजीविशेष म्हणजे, शाळांनी काही खर्चांमध्ये बचतही केली आहे. स्टेशनरी चार्जेस, झेरॉक्स चार्जेस, चहा-कॉफी खर्च, काही प्रमाणात वीज वापर, पाणी वापर, इनडोअर आणि आउटडोअर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आदींवरील खर्च आम्ही कमी केला आहे. पण या बचतीच्या तुलनेत इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.शाळांकडे उत्पन्नाचा एकच स्त्रोतगेल्या चार महिन्यांपासून स्टाफला पूर्ण आणि नियमित पगार दिला जात आहे. परंतु, आता फीची आवक नसल्याने आर्थिक समस्या उत्पन्न होत आहे. शाळांकडे आर्थिक उत्पन्नाचे अन्य स्त्रोत नसल्याने शाळांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.निवेदन सादर करताना पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रफुल्ल चपाटे, स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य नरेंद्र चौहान, महर्षी विद्या मंदिरचे प्राचार्य एस.एन. तिवारी, यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. जेकब दास, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य मिनी थॉमस, सेंट अलॉयसियसच्या प्राचार्य सिस्टर मारिया जगताप, पांढरकवडा येथील गुरुकुल स्कूलचे प्राचार्य विजय देशपांडे, वणी येथील सुवर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सी.सीवरामकृष्णा, मारेगाव येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य मनू आर. नायर, वणीच्या सुशगंगा पब्लिक स्कूलचे प्राचार्य विनीज व्ही.के. आणि वडगाव रोड वणी येथील मॅक्रून स्टुडंट अकादमीच्या श्रीमती शोभना, दिग्रस येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य शेख अबेदा बेगम आणि जिल्ह्यातील अन्य सीबीएसई शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.पालकांना त्रैमासिक शुल्काची सुविधाशाळा प्रशासनाने पालकांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन त्रैमासिक शुल्क भरण्याची सुविधा प्रदान केली आहे. तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केली नाही. पालकांच्या सुविधेकरिता ऑनलाईन शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त काही पालकांना अडचण असेल तर ते शाळेला भेट देऊ शकतात. ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले असून कोणालाही काढण्यात आले नाही. तथापि बऱ्याच पालकांचे मागील सत्र २०१९-२० मधील शैक्षणिक शुल्क येणे बाकी आहे.स्वयंघोषित नेत्यांची पालकांना चिथावणीतरीही काही पालक व पालकांचा समूह जाणूनबुजून शैक्षणिक शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच काही स्वयंघोषित नेते जे शाळेचे पालक नाहीत, ते शाळेच्या इतर पालकांना चिथावणी देत आहेत. त्यामुळे नियमित फी भरणारे पालकही संभ्रमात सापडत आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवरून शाळेची बदनामी करण्यात येत असून स्थानिक प्रशासनाकडे विनाकारण तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे शाळेला नाहक चौकशी व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याची बाब प्राचार्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Schoolशाळा