शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पोलीस निरीक्षकांच्या सव्वाचारशे जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:35 IST

राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक २१४ कोकण-२ विभागात नागपुरात ५५ तर अमरावतीत २७ रिक्त पदे

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे.राज्यातील सहायक पोलीस निरीक्षकांना बढती देण्याच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालयाने २७ जून रोजी महसूल विभाग निहाय पोलीस निरीक्षकांच्या रिक्त पदांची स्थिती जाहीर केली. त्यानुसार कोकण विभाग क्र. २ अंतर्गत निरीक्षकांच्या सर्वाधिक २१४ जागा रिक्त असल्याची नोंद आहे. नागपूर विभागात ५५, अमरावती २७, औरंगाबाद ३२, कोकण विभाग क्र. १ मध्ये ५, नाशिक २७ तर पुणे महसूल विभागांतर्गत निरीक्षकांच्या ६४ जागा रिक्त आहेत.राज्यात तालुकास्तरावरील सर्व पोलीस ठाणेप्रमुख हे निरीक्षक दर्जाचे आहे. मात्र तालुक्यांच्या तुलनेत सक्षम पोलीस निरीक्षकांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्या पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाºयांना ठाणेदार म्हणून नेमण्याची वेळ येते.

कनिष्ठांना ठाणेदार बनविण्याचा प्रयोगअमरावती ग्रामीणमध्ये एपीआय व पीएसआयला अनेक ठिकाणी ठाणेदार बनविण्यात आले आहे. यामागे निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता, अकार्यक्षमता की कनिष्ठांना संधी यापैकी नेमके कोणते कारण आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु कनिष्ठांना ठाणेदार बनवून प्रशासनाने निरीक्षकांच्या अकार्यक्षमतेवर मोहर उमटविल्याचे पोलीस दलात मानले जाते. यवतमाळातही पीआयऐवजी एपीआयला तालुकास्तरीय पोलीस ठाण्याचे ठाणेदार बनविण्याचा प्रयोग झाला आहे. त्यामागे मात्र राजकीय इच्छाशक्ती प्रबळ ठरल्याचेसांगण्यात येते.२९ एपीआय पदोन्नतीच्या यादीतपोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागा एपीआयला पदोन्नती देऊन भरल्या जाणार आहे. परंतु राज्यात निरीक्षकांच्या ४२४ जागा रिक्त असताना पदोन्नतीसाठी केवळ २९ सहायक निरीक्षकांची यादी विचाराधीन आहे. त्यांना नेमकी कोणत्या महसुली संवर्गात नियुक्ती हवी, याबाबत पसंतीक्रम मागण्यात आला आहे. चक्राकार पद्धतीने या नियुक्त्या होणार आहेत.३९५ जागा रिक्तच राहणारकेवळ २९ एपीआयलाच बढती मिळाल्यास राज्यात निरीक्षकांच्या ३९५ जागा पुन्हा रिक्त राहणार आहे. आगामी सण-उत्सव व निवडणुका लक्षात घेता निरीक्षकांच्या एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्यास उपलब्ध पोलीस अधिकाºयांवर कामाचा ताण वाढणार एवढे निश्चित.

टॅग्स :Policeपोलिस