शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

कापूस खरेदी सुरू करा

By admin | Updated: October 21, 2015 02:41 IST

दिवाळी जवळ येऊनही अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेचात पडले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी : बाभूळगाव संकलन केंद्रावर लक्षबाभूळगाव : दिवाळी जवळ येऊनही अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेचात पडले आहेत. बाभूळगाव कापूस संकलन केंद्रावर तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत जवळपास सव्वाशे गावे जोडलेली आहे. बाभूळगाव संकलन केंद्रावर एक ते सव्वा लाख क्विंटल कापसाची आवक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांची कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. कापूस वेचणीला प्रारंभ झाला आहे. दिवाळी जवळ आलेली असून कापूस खरेदी अद्यापपर्यंत सरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस कुठे न्यावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यंदा कापसाचे उत्पादन पाहता लवकरात लवकर कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाभूळगाव संकलन केंद्रापासून सर्व कापूस संकलन केंद्रही जवळपास २५-३० किलोमीटरवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. कार्यक्षेत्रामध्ये दोन खासगी जिनिंग चालू अवस्थेत असून दोन सहकारी व फेडरेशन जिनिंग बंद अवस्थेत आहेत. सॉ जिनिंग हा कापूस पणन महासंघाच्या मालकीचा असून हा जीन बंद पडल्यामुळे बाभूळगाव बाजारपेठेमध्ये अवकळा पसरली आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी सदर जीन चालू करण्याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाल्यास बाभूळगावच्या बाजारपेठेला जुने वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे. बाभूळगाव बाजार समिती ही एकमेव संस्था कार्यरत असून धान्याच्या उत्पन्नावर या बाजार समितीचे अस्तित्व कायम आहे. येथे सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला ३५०० ते ३८०० असा भाव आहे. खासगी व्यापारी व सीसीआय यांचे धोरण निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ९ नोव्हेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे लागलेले आहे. त्यातच कापूस पणन महासंघाचा व सहकारी रामचंद्र जिनिंग बंद असल्यामुळे तसेच खासगी कापूस खरेदीची, सीसीआयची अनिश्चितता असल्यामुळे कापूस विक्रीसाठी कोठे न्यावा, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)