शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे तिकीट कमी झाले ट्रॅव्हल्स मात्र महागडीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 22:42 IST

जागा मिळावी व सुखरुप प्रवास व्हावा या हेतूने अतिरिक्त रक्कम माेजून तिकीट खरेदी केले जाते. एसटी महामंडळाने दहा टक्के तिकीट वाढ केली होती. दिवाळी संपताच दर कमी केले. ट्रॅव्हल्सचे दर मात्र अजूनही कायम आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात कपात केली आहे; मात्र ही कपातही तुटपुंजी अशीच आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची लूट होत राहते. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील नागरिकांना पुणे, मुंबई या महानगरात जाण्यासाठी यवतमाळातून खासगी ट्रॅव्हल्स व एसटी बसशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात घराबाहेर असलेले विद्यार्थी, चाकरमाने आपल्या गावी परततात. त्यामुळे अचानकच प्रवासी संख्या वाढते. हे हेरुन ट्रॅव्हल्स चालक मनमानी तिकिटाचे दर आकारतात. अक्षरश: तिकिटाच्या दरासाठी बोली लावली जाते. जागा मिळावी व सुखरुप प्रवास व्हावा या हेतूने अतिरिक्त रक्कम माेजून तिकीट खरेदी केले जाते. एसटी महामंडळाने दहा टक्के तिकीट वाढ केली होती. दिवाळी संपताच दर कमी केले. ट्रॅव्हल्सचे दर मात्र अजूनही कायम आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात कपात केली आहे; मात्र ही कपातही तुटपुंजी अशीच आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची लूट होत राहते. 

प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनीचे दर वेगळेप्रवाशांची संख्या पाहून तिकिटाचे दर आकारले जातात. त्यातही ट्रॅव्हल्समधील पुढचा आणि खालचा बर्थ याचे तिकीट सर्वाधिक असते. मागील बाजूला असलेल्या बर्थच्या तिकिटाचे दर कमी असते. बुकिंग करूनही अधिक रक्कम मोजावी लागते. या प्रकारे लूट होते. 

ट्रॅव्हल्सविरोधात एकही तक्रार नाही

आरटीओंनी मनमानी तिकीट दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सची तक्रार करा, त्यासाठीचे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले. ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त भाडे वसूल केले जात आहे. अशी एकही तक्रार आरटीओंकडे प्राप्त झाली नाही. त्यामुळे कारवाई झाली नाही. 

एक नोव्हेंबरपासून एसटीचे तिकीट पूर्ववत- दिवाळीत एसटी महामंडळाने तिकिटाचे दर दहा टक्के वाढविले होते. यातून महामंडळाला चांगली कमाई करता आली. - प्रवाशांची संख्या आता रोडावली आहे. त्यामुळे तिकिटाचे दरही कमी करण्यात आले आहेत. 

तक्रार केल्यास कारवाई निश्चित  ट्रॅव्हल्सच्या प्रकारानुसार तिकिटाचे दर निश्चित केले आहेत. त्यापेक्षा अतिरिक्त प्रवास भाडे घेतल्यास कारवाई करता येते. नागरिकांनी या संदर्भात योग्य ती तक्रार करावी. तक्रार प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई केली जाईल.         - ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :state transportएसटीticketतिकिट