लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परिवहन महामंडळाचे कर्मचारी महिनाभरापासून संपावर आहेत. या काळात सुरुवातीचे काही दिवस सर्व कर्मचारी कामावर होते. साधारणत: २६०० कर्मचारी या काळात आपल्या विविध आस्थापनांमध्ये सेवा देत होते. त्यानुसार ७ तारखेला एक कोटी २० लाख रुपयांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. काम केलेल्या दिवसाचाच पगार परिवहन महामंडळाने काढला आहे. यामुळे इतर दिवशी काम नाही, तर दामही नाही या नियमानुसार वेतन अदा झाले आहे.
२० बसेस धावू लागल्यामहिनाभराच्या संपानंतर २० बसेस मंगळवारी धावल्या. त्यामध्ये वणी सात, पांढरकवडा सहा, यवतमाळ तीन याशिवाय नेर, पुसद, दिग्रस आणि उमरखेड येथेही बस धावली.
३०१ कर्मचाऱ्यांवर कारवाई- न्यायालयाच्या आदेशाचे आणि परिवहनमंत्र्यांच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे परिवहन महामंडळाने नऊ आगारातील ३०१ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. कारवाईची मोहीम सुरूच आहे. सेवा समाप्ती आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
५१ जणांच्या बदल्या
- आदेशाची अवहेलना करणारे आणि आंदोलन चिघळविणारे कर्मचारी परिवहन महामंडळाने बदली करून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित केले. यामध्ये नऊ आगारांमधून ५१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
७ तारखेला झाला २६०० जणांचा पगार९ नोव्हेंबरपर्यंत कामावर असलेल्या २६०० कर्मचाऱ्यांचे वेतन परिवहन महामंडळाने अदा केले आहे. काही कर्मचाऱ्यांना उपस्थितीनुसार केवळ दोन दिवसांचा पगार अदा करण्यात आला आहे.
काम असेल तरच दामपरिवहन महामंडळाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. मग तो कर्मचारी एक दिवसही कामावर असला तरी त्याचे वेतन या महिन्यात अदा करण्यात आले आहे. यानुसार सर्वच कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक