‘एसटी’ कर्मचाऱ्यांची होत आहे मुस्कटदाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:12+5:30

आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थितीत नसल्याने त्याच्या नोंदी घेणे शक्य होत नाही.

'ST' employees are facing a backlash | ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची होत आहे मुस्कटदाबी

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची होत आहे मुस्कटदाबी

googlenewsNext
ठळक मुद्देबाजू मांडण्याची संधी नाही : चालक-वाहकांना केले जात आहे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नादुरुस्त वाहनेही मार्गावर घेऊन जाण्याची जोखीम स्वीकारली जाते. हे सर्व करत असतानाही अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यातही बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केली जाते. या प्रकाराविषयी कर्मचाऱ्यांमधून कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ आगारात बसेसची स्थिती अत्यंत दयनीय आहे. आवश्यक साहित्य बसमध्ये नाही. स्पेअर टायर, अग्नीशमन सिलिंडर, दोर, चालक सेफ्टी बेल्ट अनेक बसेसमध्ये नाही. बसच्या खिडक्या दरवाजे तुटलेले-फुटलेले आहे. सीट फाटलेल्या आहे. इंडिकेटर आणि हॉर्न वाजत नाही. याही स्थितीत बस मार्गावर न्यावी लागते. महामंडळाचे उत्पन्न वाढावे, आगारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यादृष्टीने ही धडपड असते. मात्र याचा हिशेब अधिकाºयांकडून ठेवला जात नाही. उलट कारवाई केली जाते. काही कर्मचाºयांवर तर निलंबनासारखी कारवाई करण्यात येते.
आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थितीत नसल्याने त्याच्या नोंदी घेणे शक्य होत नाही. अशावेळी बसमधील प्रवासी संख्या जुळविणे वाहकांना कठीण जाते. सुस्थितीतील इटीआय मशीन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे वाहक वर्गांकडून सांगितले जाते. ही बाब त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे मांडली आहे. यावर होणाºया उपाययोजनांकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

नियमानुसार कामगिरीसाठी सहकार्य करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्देशित केलेल्या नियमानुसारच कामगिरी पार पाडण्यास अधिकाºयांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा अन्यायग्रस्त कामगारांनी व्यक्त केली आहे. बसमध्ये आवश्यक त्या बाबी परिपूर्ण असेल तरच कामगिरी पार पाडली जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महामंडळाला स्वच्छ, खिडक्या, दरवाजे न तुटलेल्या बसेस, सेफ्टी बेल्ट या सुविधा असलेल्या बसेस चालक-वाहकांना उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे.

Web Title: 'ST' employees are facing a backlash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.