शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी ड्रायव्हर-कंडक्टरची अवस्था काळीपिवळीवाल्यांसारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या नियमानुसार सध्या एसटी बसमध्ये बालके आणि वृद्धांना प्रवेश नाही. पण एसटी तोट्यात चालविण्यापेक्षा कंडक्टर-ड्रायव्हर याही प्रवाशांना एन्ट्री देत आहे. २२ प्रवासी गाडीत बसविताना ‘हाफ तिकिट’वाला एकही प्रवासी घेतला जात नाही. वृद्धांनाही फुल तिकिट लागतेय. शिवाय, सायंकाळच्या शेवटच्या फेरीच्या वेळी तर २५-३० प्रवासी बसवून नेले जाते.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी कंठशोष : चला हाये का घाटंजी.. नेर.. आर्णीवालेऽऽऽ, एसटी चाललीच पाहिजे, ही सर्वाची भावना

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाऊ कुठंसा चाल्ले? आर्णी हाये का? मंग यानं लागूनच हाये एसटी... राळेगाव असन तं १५ मिनिट लागते.. येते पन गाडी.. बसा जराकसे..!यवतमाळच्या बसस्थानकावर प्रवाशांना अक्षरश: धरून ठेवण्यासाठी महामंडळाच्या कंडक्टर-ड्रायव्हरला असा कंठशोष करावा लागत आहे. पूर्वी काळीपिवळी चालक असेच प्रवाशांना पकडून वाहनात कोंबायचे. आता ती वेळ परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे.लॉकडाऊनमुळे लोकवाहिनी एसटी लोकांविना थांबली होती. आता ती कशीबशी सुरू झाली. मात्र लोक एसटीत बसायलाच तयार नाही. पण एसटीच्या उत्पन्नावरच चालक आणि वाहकांचे पगार अवलंबून आहेत. म्हणून हे कर्मचारी घर चालविण्यासाठी कसेही करून एसटी चाललीच पाहिजे, या भावनेने झटत आहेत.तब्बल अडीच महिन्यांच्या ‘ब्रेक’नंतर जिल्हांतर्गत वाहतूक एसटीने सुरू केली. परंतु, कोरोनाच्या भीतीपायी त्यात अटी लादल्या गेल्या. एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना परवानगी आहे. त्यातही छोटी मुले अन् वयोवृद्धांना ‘एन्ट्री’च नाही. या दोन वयोगटाच्या मधला प्रवासी सध्या स्वत:च्या दुचाकीने प्रवास करण्यास प्राधान्य देतोय. त्यामुळे ‘येसटीचा डब्बा ढलढल रिकामा धावून रायला’ अशी व्यथित प्रतिक्रिया महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळाली.यवतमाळ बसस्थानकावरचे शुक्रवारचे ताजे चित्र असे होते... राळेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या शोधासाठी चालक विठ्ठल वनकर सर्वत्र चकरा मारत होते. मध्येच कोणी पिशवी वगैरे घेऊन दिसला की लगेच त्यांचा प्रश्न, ‘काय म्हंता साहेब, राळेगाव का पांढरकवडा?’ समोरच्याने हो म्हटले की ते त्याला संबंधित प्लॅटफॉर्मवर अदबीने बसण्याची सूचना करीत होते. मग थोड्या वेळाने घाटंजी-यवतमाळ (एमएच ४०/६०७८) ही बस दाखल झाली. सारे प्रवासी उतरल्यावर कंडक्टरने दहा-बारा प्रवाशांच्या चिल्लरचा प्रश्न मिटविला. पण तरीही ३० रुपये जास्तीचे कंडक्टरजवळ उरले. इतरवेळी हे पैसे कंडक्टरकडेच राहिले असते. पण या कंडक्टरने किमान १५ वेळा ओरडून ‘आरे हे पैसे कोणाचे राह्यले हो?’ म्हणून परिसर धुंडाळला. शेवटी १५ मिनिटांनी एक तरुण त्यांना शोधत आला अन् पैसे घेऊन गेला... मग या कंडक्टरची धडपड सुरू झाली घाटंजीकडे जाणारे प्रवासी शोधण्यासाठी. ‘का हो बावाजी कोण्या गावाले? कळंब का? मंग थे तिकडं लागून हाये गाडी.. जा तिकडं’ हे त्याचे शब्द म्हणजे प्रवाशांना देव मानून त्यांची मनोभावे आराधना करण्याचाच प्रयत्न होता.... अन् एवढे करूनही आमचा पगार अर्धाच !एसटी तोट्यात चालू नये, म्हणून कंडक्टर-ड्रायव्हर जीवाचे रान करीत आहेत. पण एवढे हाल भोगूनही आम्हाला ५० टक्केच पगार दिला जाणार आहे. त्यातूनच आमच्या वेगवेगळ्या ‘कपाती’ होणार आहेत. मग आमच्या हाती पगार म्हणून किती पैसे येणार? त्यात घर कसे चालणार? हे प्रश्न राळेगावचे चालक विठ्ठल वनकर यांनी मांडले.प्रवासी थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीएसटी भरण्यासाठी एकेक तास लागत आहे. त्यामुळे राळेगाव, पांढरकवडा, वणी, पुसद आगार दरदिवशी दोन कर्मचारी यवतमाळ बसस्थानकावर पाठवित आहे. ते येथे आपल्या गावाकडचे प्रवासी शोधतात. बस येईपर्यंत त्यांना बसवून ठेवतात. यवतमाळातून बस निघाली की आपल्या आगाराला फोन करतात. मग तेथे थांबलेल्या प्रवाशांना बसचे लोकेशन सांगितले जाते.मुले-वृद्धांनाही बिनधोक एन्ट्रीलॉकडाऊनच्या नियमानुसार सध्या एसटी बसमध्ये बालके आणि वृद्धांना प्रवेश नाही. पण एसटी तोट्यात चालविण्यापेक्षा कंडक्टर-ड्रायव्हर याही प्रवाशांना एन्ट्री देत आहे. २२ प्रवासी गाडीत बसविताना ‘हाफ तिकिट’वाला एकही प्रवासी घेतला जात नाही. वृद्धांनाही फुल तिकिट लागतेय. शिवाय, सायंकाळच्या शेवटच्या फेरीच्या वेळी तर २५-३० प्रवासी बसवून नेले जाते.

टॅग्स :state transportएसटी