शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाने दिली अस्थायी कामगारांना बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:24 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देनियमांना तिलांजली : भविष्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. हजारावर कामगारांना मागील अनेक वर्षापासून स्थायी करण्यात आलेले नाही. यामध्ये भविष्यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.एसटी महामंडळात रुजू झाल्यानंतर प्रथम वेतनवाढ देण्यापूर्वी कामगारांना स्थायी करणे आवश्यक आहे. मात्र यवतमाळ विभागात ही प्रक्रियाच मागील काही वर्षांपासून करण्यात आलेली नाही. या कर्मचाºयांना महामंडळाचे सर्व आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र स्थायी करण्यात आले नसल्याने त्यांची सेवा नेमकी किती वर्ष झाली हा प्रश्न पुढील काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कामगारांना स्थायी करावे लागते यापासून काही कर्मचारी अनभिज्ञ आहेत. सदर प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाºयांना यासाठी जबाबदार धरून कारवाई करावी तसेच जुन्या तारखेपासूनच स्थायी आदेश काढण्यात यावे, अशी मागणी या कामगारांमधून जोर धरू लागली आहे.दरम्यान एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सुरेश कन्नाके यांनी यासंदर्भात विभाग नियंत्रकांकडे तक्रार नोंदविली आहे.खातेअंतर्गत बढतीस्थायी नसलेल्या कर्मचाऱ्यांना खाते अंतर्गत बढती देण्याची किमया यवतमाळ विभागात करण्यात आली आहे. स्थायी कर्मचाऱ्यांनाच अटी पूर्ण करत असल्यास बढती परीक्षेस परवानगी दिली जाते. यानंतरच पुढे बढती मिळते. यवतमाळात मात्र एसटी महामंडळाच्या सर्व नियमांना तिलांजली देवून अस्थायी कामगारांना बढती दिली गेली आणि दिली जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ