शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:45 IST

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे.

ठळक मुद्देगुरुजी प्रॅक्टीकल गुणांच्या भ्रमात राहिल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. त्यासाठी विविध कारणे सांगितली जात असली तरी शिक्षण विभागाने या वर्षापासून बंद झालेले प्रात्यक्षिकाचे गुण हे प्रमुख कारण पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.९९ टक्के एवढा लागला होता. परंतु शनिवारी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी अवघी ६६.३३ एवढी नोंदविली गेली. वर्षभरात दहावीचा निकाल सुमारे १८ टक्क्यांनी घटला. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा सर्वात शेवटी अर्थात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. या घटलेल्या टक्केवारीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. ३४ टक्के विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपर्यंत सर्वच विषयात प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात होते. परंतु यावर्षापासून हे गुण केवळ गणित व विज्ञान या विषयांपुरते मर्यादित करण्यात आले. त्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. याशिवाय आठवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय, कॉपीमुक्ती अभियान, दहावीत विद्यार्थ्यांना लागणारे उच्चशिक्षणाचे वेध, दहावीतच या उच्च शिक्षणाची सुरू झालेली तयारी, त्यामुळे दहावीच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, मोबाईलचा वापर याबाबीही कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात सातत्याने बदल्यांच्या राजकारणात व्यस्त राहणाऱ्या शिक्षक मंडळींकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप पालकवगार्तून केला जात आहे. नापास विद्यार्थ्यांमध्ये अनेक महागड्या व नामांकित कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचीही माहिती आहे.

मोटिव्हेशनमध्ये शिक्षक कमी पडलेजिल्ह्याच्या १८ टक्क्यांनी घटलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचे मोटिव्हेशन करण्यात कमी पडले, त्यांनी विद्यार्थ्यांवर त्याच्या यशासाठी पुरेसे परिश्रम घेतले नाही. गेल्या वर्षीची प्रॅक्टीकलच्या २० मार्कांची सवलत बंद झाली. मात्र शिक्षक वर्ग या सवलतीच्या भ्रमात राहिला. त्यातून शिक्षकांनी बाहेर निघून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रेरणादायी शिक्षण देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष झाले आणि बोर्डाने या शिक्षकांना झटका दिला, अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्याने नोंदविली. या घटलेल्या निकालासाठी बहुतांश शिक्षकांचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल