पांढरकवडा : शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, तसेच शासकीय कामात हयगय सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार राजू तोडसाम यांनी दिला.येथील स्व.नागेश्वर जिड्डेवार रंगमंचमध्ये सोमवारी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार राजू तोडसाम व प्रा.अशोक उईके यांनी केळापूर तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात तसेच विविध विभागातील समस्या संदर्भात आढावा घेतला. प्रथम आमदार तोडसाम यांनी केळापूर तालुक्यातील गावनिहाय संभाव्य पाणी टंचाईचा आढावा घेतला. तसेच योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ज्या गावांमध्ये हातपंप नादुरूस्त आहेत, ते दुरूस्त करण्याचे तसेच ज्या-ज्या ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करावयाच्या आहेत, तेथे त्वरित विहिरी अधिग्रहीत करण्याचे निर्देश दिले. आमदार तोडसाम व आमदार उईके यांच्यासह सभापती मल्लारेड्डी पानाजवार, उपसभापती रेणुका गेडाम, जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती सदस्य सविता तेलंगे, मदन जिड्डेवार, रमेश उग्गेवार, संतोष चिंतावार, किशोर घाटोळ, आकाश कनाके, बशीर शेख, मंगेश वारेकर आदी उपस्थित होते. केळापूर तालुक्यातील परंतू राळेगाव मतदारसंघात येणाऱ्या गावांचा संभाव्य पाणी टंचाई व ईतर विभागाचा आमदार प्रा.उईके यांनीही यावेळी आढावा घेतला. त्यांनी योग्य उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले. दोनही आमदारांनी विविध उपययोजना करण्याचे निर्देश दिले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. बैठकीला लोकप्रतिनिधी, नागरिक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Updated: December 31, 2014 23:31 IST