शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राजकारणात मतदारांची बोळवण

By admin | Updated: October 30, 2016 00:23 IST

स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात

उमरखेड : स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात असा अलिकडे नेत्यांचा गोड समज होऊन बसलाय. हे सूत्र धरुन पक्षीय विचारसरणीला फाटा देण्याची प्रथा स्थानिक निवडणुकांमध्ये बोकाळून आघाड्यांचे राजकारण स्थानिक पातळीवर सरसकट दिसत आहे. उमरखेड नगरपालिकेतही तेच घडले. खरे तर कोणत्याच पक्षात एकवाक्यता अलिकडे राहिलेली नाही. लोकांना जे अपेक्षित असते ते कधीच घडत नसते. भाजपा-सेनेमध्ये स्थानिक स्तरावर तरी युती होईल, हे दोनही पक्ष एकत्रित लढतील असे उमरखेडच्या जनतेला वाटले होते. पण तसे घडलेच नाही. माहेश्वरी काँग्रेसचेच; परंतु कॉँग्रेसची कार्यशैली आणि काँग्रेसमधीलच काही अट्टाहासी लोकांवर ठपका ठेऊन माहेश्वरी गटाने भाजपाशी साठगाठ केली. सेनेचे भाजपाशी जुळण्याचे संकेत मुळीच दिसत नाहीत हे पाहून माहेश्वरी गटाने तातडीने भाजपाशी साठगाठ केली. इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांच्याशी जवळीक करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरूच ठेवला. परंतु कोणत्याच गटाला जागीरदारांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवता आला नाही. कारण जागीरदारांच्याच प्रयत्नाने नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीमध्ये एका प्रामाणिक विचारमंचाच्या माध्यमातून २००१ मध्ये प्रस्थापितांच्या सत्तेला उमरखेडमध्ये हादरा दिला होता हे विशेष. प्रत्येक गट जागीरदारांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. जनतेच्या मनात जागीरदारांची कारकीर्द अजूनही ताजी आहे. उमरखेडच्या जनतेला आता प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला त्यांच्या अधिकारातल्या सुख-सुविधा मिळतील काय? कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबेल काय ? सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य अबाधित राहील काय? इत्यादी प्रश्नांनी नागरिकांना घेरले आहे. सोईचे राजकारण करून निवडणुकीच्या तोंडावर आघाड्यांच्या कुबड्या घेऊन परत सत्तेत मिरवणाऱ्यांचीही आता नागरिकांना चीड येत आहे. (प्रतिनिधी)