शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांचे ते भाषण संस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:47 IST

सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

ठळक मुद्देअणे विद्यालयाचा रौप्य महोत्सव : विद्यार्थिनींना दिला होता मूलमंत्र

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषण यवतमाळकरांच्या आजही स्मरणात आहे.स्वराज यांच्या राहणीतील साधेपणा आणि उच्चविचारांनी यवतमाळकर भारावून गेले होते. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वाढवून प्रगती कशी करावी, या विषयावर त्या बोलल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी या विषयावर मार्गदर्शन केले.सुषमा स्वराज यांच्या वक्तृत्वाने सारेच भारावून गेले होते. त्यांच्या मौलिक विचाराने अनेक युवतींच्या आयुष्याला दिशा मिळाली. यामुळे त्यांचे भाषण आजही प्रत्यक्षदर्शींच्या स्मरणात आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव कायम आहे. त्यांच्या कार्यशैलीतून अनेकबाबी त्यावेळी यवतमाळकरांना शिकायला मिळाल्या. त्यावेळी सुषमा स्वराज यवतमाळात दोन दिवस मुक्कामी होत्या. अस्मिता या स्मरणिकेचे प्रकाशन त्यांनी केले. त्यांनी स्वत: निरोप घेताना आदरातिथ्याचे कौतुक केले. यावेळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म.ल.काशीकर, सचिव रमेश मुणोत, अ‍ॅड .श्रीहरी अणे, राजाभाऊ ठाकरे, अरूण अडसड, हरिभाऊ तत्त्ववादी, मनोहर धर्माधिकारी, दिवाकर पांडे आदी स्वागतासाठी पुढे आले होते.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. त्या आम्हा महिलांसाठी आदर्श होत्या. स्पष्ट बोलणाऱ्या आणि त्या बोलण्यातून कुणालाही न दुखविणाºया त्या होत्या. त्यांच्या वक्तृत्वाने मी भारावून गेले होते. आजही त्या माझ्यासाठी आदर्श आहेत.- डॉ. कविता तातेड, प्राध्यापक, अणे महिला विद्यालय

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजStudentविद्यार्थी