शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सोयाबीन सात हजारांवर; विकू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

सोयाबीनचे दर गुरुवारी ७५०० रुपये क्विंटलवर होते. शुक्रवारी दर घसरले, ते ७१०० झाले. शनिवारी या दरामध्ये सुधारणा झाली यामुळे सोमवारी बाजार ७३०० वर जाण्याची शक्यता आहे. पुढे सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज आहे. हे दर आठ हजारांपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता आहे.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यावर्षी सोयाबीनचे दर साडेसहा हजार रुपये क्विंटलवर थांबतील, असे भवितव्य वर्तविले जात होते. मात्र, युद्धाने सारे चित्रच बदलवून टाकले. सोयाबीनचे दर अचानक ७५०० वर पोहोचले. यानंतर दरामध्ये घसरण झाली, आता शनिवारी पुन्हा दर सुधारले आहे. यामुळे दरात पुढेही तेजी राहील, अशी शक्यता आहे.

गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ११ हजारांचा 

- गतवर्षी मे, जून महिन्यात सोयाबीनला ११ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. असाच दर यावर्षी वाढेल अशी अपेक्षा होती. त्यामध्ये अनिश्चितता आहे.

 उत्पादक म्हणतात.... 

शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विकत आहे. यावर्षी ४० टक्के सोयाबीन शेतकऱ्यांकडे असण्याचा अंदाज आहे. युद्धामुळे दर खालीवर होत आहेत. मात्र, वाढतील, अशी प्रत्येकांनाच अपेक्षा आहे.- पंडित हिंगासपुरे, शेतकरी

कापसाचे भाव १२ हजारांवर जातील आणि सोयाबीनचे दर दहा हजारांवर जाईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. यानंतरच शेतकरी शेतमाल विकायला काढतील.- विनोद गुल्हाने, शेतकरी

 आणखी भाव वाढणार 

सोयाबीनचे दर गुरुवारी ७५०० रुपये क्विंटलवर होते. शुक्रवारी दर घसरले, ते ७१०० झाले. शनिवारी या दरामध्ये सुधारणा झाली यामुळे सोमवारी बाजार ७३०० वर जाण्याची शक्यता आहे. पुढे सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.- गाैतम चोरडिया, व्यापारी

युद्धामुळे सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज आहे. हे दर आठ हजारांपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता आहे. मात्र, ते कधी पोहोचेल हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार आपल्या शेतमालाची विक्री करावी, सध्याचे दरही चांगले आहेत.- राजू जैन, व्यापारी

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड