लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हमी दरापेक्षा कमी किमतीत सोयाबीनची खरेदी करणाºया व्यापाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. तरीही हमी दराखाली सोयाबीनची खरेदी सुरूच आहे. व्यापाºयांनी शेतकºयांकडून चक्क हमीपत्र लिहून घेत ही खरेदी सुरू ठेवली आहे.राज्य शासनाने सोयाबीनला ३०५० रूपये प्रती क्विंटलचा दर जाहीर केला. या हमी दराच्यावर व्यापाºयांनी सोयाबीनची बोली लावणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला २२०० ते २६५० रूपये क्विंटलचा दर आहे. हमी दरापेक्षा हा दर ८०० रूपयांनी कमी आहे. हमी दराखाली सोयाबीन खरेदी होत असल्याने शेतकरीच पिळले जात आहे.या प्रकाराला चाप लावण्यासाठी राज्य शासनाच्या फौजदारी कारवाईचा उतारा आहे. मात्र व्यापाºयांनी यातून पळवाट शोधत चक्क शेतकºयांकडून हमीपत्र लिहून घेण्यास सुरूवात केली आहे. कमी दरात सोयाबीन विकण्यास मी तयार आहे, असे त्यांच्याकडून लिहून घेतले जात आहे. यातून व्यापाºयांची सुटका झाली. मात्र शेतकरी लुबाडला जात असल्याचे दिसून येते.तीन तालुक्यात धान्य खरेदीजिल्ह्यातील तीन तालुक्यात शुक्रवारपासून मूग आणि उडदाची खरेदी सुरू होणार आहे. नऊ तालुक्यांमध्ये १६ आॅक्टोबरपासून यवतमाळ, दिग्रस, नेर, पांढरकवडा, उमरखेड, दारव्हा, राळेगाव, पुसद, आर्णी या तालुक्यात हमी दराने सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे. खरेदी विक्री संघ ही सोयाबीन खरेदी करणार आहे. संबंधित तालुक्यातील शेतकºयांनाच धान्य खरेदीची नोंदणी करता येणार आहे. तसेच आॅनलाईन नोंदणीसाठी शेतकºयांना पेरेपत्रक सक्तीचे करण्यात आले. आधारकार्ड आणि सातबारा दिल्यानंतरच मूग, उडीद आणि सोयाबीनची विक्री करता येणार आहे.
सोयाबीन खरेदी हमी दराखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:08 IST
हमी दरापेक्षा कमी किमतीत सोयाबीनची खरेदी करणाºया व्यापाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. तरीही हमी दराखाली सोयाबीनची खरेदी सुरूच आहे.
सोयाबीन खरेदी हमी दराखालीच
ठळक मुद्देसर्रास लूट : व्यापाºयांनी शेतकºयांकडून हमीपत्र घेतले