शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

शालेय स्रेहभोजनातून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण

By admin | Updated: February 4, 2016 02:27 IST

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. सिमेंट काँक्रिटच्या जंगलातील माणसे आत्मकेंद्री तर गावगाड्यातील माणसे वेगवेगळ्या कारणांनी विभाजित झाली आहे.

विवेक ठाकरे दारव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. सिमेंट काँक्रिटच्या जंगलातील माणसे आत्मकेंद्री तर गावगाड्यातील माणसे वेगवेगळ्या कारणांनी विभाजित झाली आहे. अशा गावखेड्यात सामाजिक सलोखा पुन्हा जिवंत व्हावा म्हणून दारव्हा पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून स्रेहभोजनाचे कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण केले जात आहे. तालुक्यातील ८० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दारव्हा पंचायत समितीअंतर्गत १३५ शाळा आहे. या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा विडा गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी आणि विस्तार अधिकारी विकास घाडगे यांनी घेतला आहे. ११ केंद्रप्रमुख, आठ विषयतज्ज्ञ आणि मुख्याध्यापक व शिक्षकांच्यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावकऱ्यांना यात सहभागी करून घेतले आहे. शाळांमध्ये दररोज विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत खिचडी दिली जाते. मात्र दारव्हा पंचायत समितीने आता मुलांसोबतच पालकांनाही यात सहभागी करून घेण्याचा निश्चिय केला. गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी मुख्याध्यापकांच्या बैठकीत स्रेहभोजन उपक्रमाची माहिती दिली. राजुरा येथील एक पालक यासाठी तयार झाला. शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना स्रेहभोजन दिले. ही माहिती इतर शाळांनाही मिळाली. त्यामुळे इतर शाळाही तयार झाल्या.विद्यार्थ्यांना पुरणपोळी, दूध, तूप, सलाद, पुरी-भाजी, पुलाव, कढी, जिलेबी असे जेवण मिळू लागले. खिचडी जेवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत असे पंचपक्वान्न मिळू लागले. सुरुवातीला स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी या स्रेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आता विविध दिवशीही लोकसहभागातून स्रेहभोजन कार्यक्रम केले जात आहे. आतापर्यंत राजुरा, जवळा, दहेली, रामगाव हरू, लोही, चिकणी यासह ८० शाळांमध्ये हा उपक्रम पार पडला. मुलाचा वाढदिवस शाळेतदारव्हा तालुक्यात स्रेहभोजन हा उपक्रम एका विद्यार्थ्याच्या वाढदिवसापासून सुरू झाला. मुख्याध्यापकाने राजुरा येथील पालकांना अशा उपक्रमाची माहिती दिली, तेव्हा तेथील एक पालक स्रेहभोजन देण्यास तयार झाला. त्याने आपल्या मुलाचा वाढदिवस शाळेत साजरा करून विद्यार्थी व पालकांना स्रेहभोजन दिले आणि तेथून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.