शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

लग्नसोहळ्यातून सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 22:32 IST

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

ठळक मुद्देलेक वाचवा, लेक शिकवा : श्रमदान करून नववधूचा गृहप्रवेश

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.दारव्हा येथील जीवन काळे हा युवक ओम युवा मंच व युवक टिमचा सक्रिय कार्यकर्ता असून विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतो. सामाजिक जाणीवेतून काही तरी वेगळं करण्याचा ध्यास होता. ३० एप्रिल रोजी जीवन व राणी विवाह बंधनात अडकले. विवाह संस्मरणीय ठरला. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संदेश देणारे फलक लक्ष वेधून घेत होते.लग्न सभागृहात स्वच्छ भारत मिशनचा फलक व्हराड्यांना कर्तव्याची जाणीव करून देत होता. लेक वाचावा-लेक शिकवाचा सचित्र संदेश मुलींविषयी आत्मसन्मान जागविणारा ठरला. एवढेच नव्हे, तर पारंपारिक मंगलाष्टके आटोपताच नवदांपत्यासह वऱ्हाडी मंडळीने ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ची शपथ घेतली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या अर्चना उडाखे यांनी सदर शपथ वदवून घेतली.भोजनस्थळी अन्नाची नासाडी टाळण्याबाबतचा संदेश अंतर्मुख करायला लावणारा होता. भोजनावर मनसोक्त ताव मारल्यानंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत पाण्याचे महत्व पटवून दिले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनम्र अभिवादन करण्यात आले. सोबतच पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे नवरीला निरोप दिल्यानंतर गृहप्रवेशापूर्वी भुलाई येथे जावून पानी फाऊंडेशनच्या उपक्रमात जीवन व राणीने श्रमदान केले. जलचळवळीत सहभागी होवून वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी ओम युवा मंच, युवा टीम, सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.नववधू-वरासह वऱ्हाड्यांनी घेतली शपथलेक वाचवा-लेक शिकवासाठी मी वचन बद्ध आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यास..., मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यास ..., मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता बदलण्यास..., मुले व मुली समानता करण्यासाठी..., बालविवाह व हुंडा पद्धतीचा विरोध करण्यास..., महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यास..., प्रसूतीपूर्व गर्भनिदान तपासणीचा विरोध करण्यास ..., स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करण्यास..., मुलींचे संरक्षण करण्यास...., मी वचनबद्ध आहे.

टॅग्स :marriageलग्न