गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:03 PM2019-09-09T23:03:14+5:302019-09-09T23:04:04+5:30

शेतकरी आत्महत्या, दारुबंदी, आतंकवाद, सावकारी जाचाचा बळी ठरलेला शेतकरी, बेटी बचाव-बेटी पढाव, वृद्धाश्रम असे सामाजिक समस्यांवरील विलोभनीय देखावे साकारुन मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

Social commitment from Ganesh Festival | गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी

गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी

Next
ठळक मुद्दे‘झाडे लावा-झाडे जगवा’चा संदेश : दारव्हा येथील ओम गणेश मंडळातर्फे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील अंबिकानगरातील ओम गणेश मंडळाने यावर्षी ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा संदेश देणाऱ्या गणरायाची स्थापना केली. गणेशोत्सवातून सामाजिक बांधीलकी जपणाºया मंडळाचा हा देखावा शहरात भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला.
ओम गणेश मंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देणारे विविध प्रकारचे देखावे सादर करते. यापूर्वी शेतकरी आत्महत्या, दारुबंदी, आतंकवाद, सावकारी जाचाचा बळी ठरलेला शेतकरी, बेटी बचाव-बेटी पढाव, वृद्धाश्रम असे सामाजिक समस्यांवरील विलोभनीय देखावे साकारुन मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. हा समतोल कायम राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी गणेशोत्सवासारखा धार्मिक उत्सव चांगले निमित्त ठरु शकतो.
यावर्षी ओम गणेश मंडळाने ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा एक नवीन सामाजिक उपक्रम हाती घेतला. त्यासाठी खुद्द श्री गणेश वृक्षारोपण करीत आहे, तर त्यांचे वाहन उंदीर वृक्षाला पाणी देत असल्याचा देखावा साकारला. यातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, निखील मडसे, दिनेश वानखेडे, किशोर जवके, अमोल ठोंबरे, किशोर राऊत, रुपेश शिले, अभिषेक गावंडे, महेश दंडे आदींच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मंडळाचे कौतुक होत आहे. इतर मंडळांनी आदर्श घेण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Social commitment from Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.