शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

यवतमाळात दुर्गोत्सवातून सामाजिक प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 18:32 IST

राज्यभरातील भाविक दुर्गोत्सवातील आकर्षक देखावे बघण्यासाठी यवतमाळच्या दिशेने येत आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव परिचित आहे. या उत्सवातून विविध मंडळे सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत आहे.राज्यभरातील भाविक दुर्गोत्सवातील आकर्षक देखावे बघण्यासाठी यवतमाळच्या दिशेने येत आहे. या भाविकांचे प्रबोधन करण्याचे काम येथील दुर्गोत्सव मंडळांनी सुरू केले आहे. दुर्गोत्सवात देखाव्यांसोबत वैचारिक प्रबोधनावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक मंडळाने त्या दृष्टीने देखावा साकारला आहे. वैद्यनगरातील श्री गुरूदेव दुर्गोत्सव मंडळाचे २८वे वर्ष असून मंडळाने आगळावेगळा देखावा साकारला. मंडळाने सीमेवर लढणा-या सैनिकांना हा उत्सव समर्पित केला. प्रवेशद्वारावरच अमर शहीद समर्पण, असा उल्लेख असलेले चित्र लावले. मंडळात मातेच्या मंदिराआत मंदिर, गुरुद्वारा, चर्च असे सर्वधर्मांचे प्रतीक असलेले चित्र आणि चिन्ह अंकित केले. यातून सर्वधर्म व समतेचा संदेश देण्यात आला.समर्थवाडीमधील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळाने रेन वॉटर हार्व्हेस्टिंगवर भर दिला. रोलमॉडेलच मंदिराच्या आत ठेवण्यात आले. पडणारा पाऊस आणि छतावरील पाणी भूगर्भात जमा होतानाचे चित्र दाखविण्यात आले. घनदाट जंगलात वृक्षाखाली माँ दुर्गेची मूर्ती बसविली. विविध पक्षी आणि वन्यप्राण्यांचे वास्तव्य दर्शविले. यामुळे या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक जंगलात आल्याचा अनुभव घेतो. सोबतच मुलगी वाचवा आणि बळीराजाचे राज्य येऊ द्या, असे विचार मांडण्यात आले.लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाने माँ दुर्गेचे सगुण आणि निर्गुण रूप रेखाटले. गांधी चौकातील गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने मुलगी वाचविण्याचा संदेश दिला. स्टेट बँक चौकातील समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून मंडळाने केदारनाथचा देखावा साकारला. वृक्ष लागवडीवर भर देणारा संदेश दिला. जय हिंद दुर्गोत्सव मंडळाचे ५६ वे वर्ष असून मंडळाने मयूर पॅलेस साकारला आहे. अभयारण्यातील राष्ट्रीय पक्षांवर संपूर्ण देखावा केंद्रीत केला आहे. दहिवलकर ले-आउटमधील जय विजय दुर्गोत्सव मंडळाने वृक्षांना केंद्रस्थानी मानून माँ दुर्गेची स्थापना केली. येथे दर्शनाकरिता येणाºया प्रत्येक भक्तांना वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात येते. आर्णी नाक्यावरील एकता दुर्गोत्सव मंडळाने महाराष्ट्रीयन संस्कृती रेखाटली आहे.विजेची बचत करणारा आयफेल टॉवरफ्रान्समध्ये एक हजार ५३ फुटांचे जगातील सर्वात उंच आयफेल टॉवर आाहे. येथील राणी झाँशी चौकातील बंगाली दुर्गोत्सव मंडळाने विजेची बचत करण्याचा संदेश देत ५५ फुटांचा प्रतिकात्मक आयफेल टॉवर उभारला आहे. सोबतच श्रीकृष्णकालीन व्यक्तिरेखा साकारल्या.