शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून मिळणार साबण अन् शाम्पू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 05:30 IST

राज्यातील ५२ हजार दुकानांमध्ये अंमलबजावणी

ठळक मुद्देराज्यभरातील ५१ हजार ५०० दुकानांमधून सात कोटी ग्राहक स्वस्त धान्याची उचल करतात. यात प्रामुख्याने गहू, तांदूळ आणि साखरेचा समावेश आहे. मध्यंतरी डाळ आणि भरड धान्य मिळाले.

रूपेश उत्तरवारयवतमाळ : आतापर्यंत रेशन दुकानातून गहू, तांदूळ, तेल आणि साखर हे जिन्नस मिळायचे. यापुढे स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील ५२ हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. या वस्तू खरेदीसाठी दुकानदाराला थेट कंपनीशी संपर्क साधण्याची आणि नफा मिळविण्याची मुभा दिली आहे. 

राज्यभरातील ५१ हजार ५०० दुकानांमधून सात कोटी ग्राहक स्वस्त धान्याची उचल करतात. यात प्रामुख्याने गहू, तांदूळ आणि साखरेचा समावेश आहे. मध्यंतरी डाळ आणि भरड धान्य मिळाले. आता ते बंद करण्यात आले आहे. आता नव्याने चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, डिटर्जंट आणि शाम्पू ठेवण्यास अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या वस्तू दुकानदारांनी स्थानिक पातळीवर स्वत: खरेदी करायच्या आहेत. त्याकरिता थेट कंपनीशी दुकानदारांनीच बोलायचे आहे. बाजार दरानुसार या वस्तू स्वस्त धान्य दुकानातून विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात आली आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यावर शासनाचा हस्तक्षेप राहणार नाही. हा नफा थेट विक्रेत्यांना घेण्याची मुभा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.

विक्रेत्यांनी दिला बंदचा इशाराnरेशन दुकानदारांना मिळणारे कमिशन परवडणारे नाही. ते दिल्ली आणि तामिळनाडूप्रमाणे मिळावे, अशी मागणी राज्यातील दुकानदारांची आहे. मात्र, कमिशन वाढवून मिळाले नाही. त्याला पर्याय म्हणून असा आदेश निघाला आहे. nआमच्याकडून अशा वस्तू ग्राहक घेणार नाहीत, असा आरोप आता विक्रेते करीत आहेत. कमिशन वाढवून द्यावे आणि मोफत धान्य वितरणातील मूळ रक्कम आणि कमिशन अदा करावे, यासाठी १ डिसेंबरपासून रेशन दुकानदार संप करणार आहेत.  

या वस्तू स्वस्त दरात मिळणार नाहीत. खासगी दुकानदारांप्रमाणे विकाव्या लागणार आहेत. आमचे यातून उत्पन्न वाढणार नाही. याशिवाय पॉस मशीन फार जुन्या आहेत. त्या फोर जी अथवा फाईव्ह जीच्या द्याव्या. थकलेले कमिशन  द्यावे, कमिशनमध्ये वाढ करावी. - दिगांबर पाटील, राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र रास्त भाव दुकानदार महासंघ

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र