शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रुंझा येथे आठ किलाे गांजासह तस्कराला अटक

By सुरेंद्र राऊत | Updated: June 9, 2024 17:32 IST

तेलंगणातील अदिलाबाद येथून गांजाची खेप घेऊन आलेल्या तस्काराला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले.

यवतमाळ : जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात सीमावर्ती भागात गांजा तस्करी चालते. तेलंगणातील अदिलाबाद येथून गांजाची खेप घेऊन आलेल्या तस्काराला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. रविवारी पहाटे रुंझा येथील पेट्राेल पंप परिसरात तस्कर उभा असताना, त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ८ किलाे ८७० ग्राम गांजा जप्त केला. पाढंरकवडा पाेलिस व एलसीबी पथकाने गस्तीवर असताना, ही कारवाई केली.

पाेलीस पथकाला खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, एक निळ्या रंगाचे शर्ट घातलेला व्यक्ती प्लास्टिकच्या पाेत्यामध्ये गांजा घेऊन रुंझा गावाच्या बाहेर यवतमाळ रोडवरील पेट्रोलपंपाजवळ उभा आहे. त्यावरून पथकाने तत्काळ वरिष्ठांना याची माहिती देऊन ते ठिकाण गाठले. तेथे संशयित व्यक्ती दिसून आली. त्याला ताब्यात घेऊन चाैकशी सुरू केली. त्याच्याकडे प्लास्टिक पाेत्यामध्ये गांजा आढळून आला. अलीम खान सलीम खान (वय २९ वर्षे, रा. अबुबकर मशीदजवळ, शांतीनगर, अदिलाबाद, तेलंगणा) असे आराेपीचे नाव आहे. त्याच्याकडे खाकी टेपने गुंडाळलेल्या वेगवेगळया चार पाकिटांमध्ये एक लाख पाच हजार २०४ रुपयांचा गांजा, एक मोबाइल आढळून आला. पाेलिसांनी त्याला तत्काळ अटक करून पांढरकवडा ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीप्रमुख आधारसिंग सोनोने, पाढंरकवडा ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर, विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, उल्हास कुरकुटे, धनंजय श्रीरामे, मारोती पाटील, सचिन काकडे, राजू बेलेवार यांनी केली.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी