शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची सहा वाहने महसूलच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:50 IST

ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच अन्य ठिकाणाहून रेती आणणाऱ्या तस्करांची पळापळदेखिल झाली.

ठळक मुद्देतस्करीची शंका : तहसीलदार, एसडीओंची संयुक्त कारवाई, तस्करांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच अन्य ठिकाणाहून रेती आणणाऱ्या तस्करांची पळापळदेखिल झाली.उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे व तहसीलदार श्याम धनमने हे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शासकीय कामासाठी येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या मार्गाने जात असताना त्यांना अचानक समोरून एकाचवेळी रेतीने भरलेले पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक अशी सहा वाहने दिसली. शंका आल्याने त्यांनी या वाहनांना अडवून विचारपूस केली असता, रेती वाहतूक करणाºया चालकांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ही सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली. वृत्त लिहीस्तोवर या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती. मात्र नेमकी ही रेती वाहतूक अवैध होती की, वैध होती हे अद्याप समोर आले नाही. महसूल विभागाच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका पासवर रेतीची एकच फेरी करता येते. परंतु रेती कंत्राटदार महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून एका पासवर रेती वाहतुकीच्या अनेक फेºया मारत असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी पकडलेली वाहने नेमकी याच नियमात अडकल्याची माहिती मिळाली आहे.पकडण्यात आलेल्यांपैकी काही वाहनातून चंद्रपूर येथून रेती आणण्यात आली, तर काही वाहनात वणी परिसरातील रेती होती. यासंदर्भात तहसीलदार श्याम धनमने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. कागदपत्रांची तपासणी सुरू असून यात दोषी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. वणी तालुक्यात केवळ एकच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. रेतीची उपलब्धता नसल्याने शासकीय घरकुलांचे बांधकामदेखिल थांबले आहे. खासगी कंत्राटदारांना मात्र मुबलक प्रमाणात रेती मिळत असल्याने कमालिचे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकाच पासवर रेतीच्या अनेक फेºया मारण्याचा प्रकार सर्रास या परिसरात सुरू आहे. हे नियमबाह्य असले तरी रेती कंत्राटदार त्याला जुमानत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. महसूल विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा रेती तस्कर घेत आहेत.

टॅग्स :sandवाळू