शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सहा पिस्टल, बारा काडतूस जप्त, सहा तस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:46 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी पिस्टल घेऊन विक्रीसाठी यवतमाळात आला असताना त्याला बुधवारी रात्री नागपूर रोडवर रंगेहात अटक करण्यात आली. यात काँग्रेस नगरसेवकासह मंडी टोळीतील तीन गुंडांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देकाँग्रेस नगरसेवकाचा समावेश : ‘मंडी’चेही सदस्य, विक्रेते-खरेदीदारांवर ट्रॅप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी पिस्टल घेऊन विक्रीसाठी यवतमाळात आला असताना त्याला बुधवारी रात्री नागपूर रोडवर रंगेहात अटक करण्यात आली. यात काँग्रेस नगरसेवकासह मंडी टोळीतील तीन गुंडांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.रवींद्र ऊर्फ रवी गणेश उमाळे (३५) रा.टुणकी (ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा), काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा ऊर्फ सलीम सागवान (रा.यवतमाळ), मंडी टोळीतील राम ऊर्फ चिमणलाल शर्मा, नीलेश धरमदास सोनोरे, चंद्रप्रकाश ऊर्फ तातू रमाकांत मुराब (सर्व रा.यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. टोळीविरोधी पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी एमआयडीसी परिसरात संग्रामपूर येथून देशी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या गजानन ठाकरे याला अटक करून दोन पिस्टल जप्त केल्या होत्या. मात्र मुख्य सूत्रधार रवी उमाळे पसार होण्यात यशस्वी झाला होता.या घटनेपासून रवी उमाळे याच्यावर टोळीविरोधी पथकाची पाळत होती. गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, संतोष मनवर व त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ७ वाजता आरटीओ कार्यालयामागील भाग्यनगर ते मल्हारनगर दरम्यान गुलिस्ता ले-आऊटच्या रोडवर सापळा रचला. येथे आरोपी रवी उमाळे हा सहा देशी पिस्टल व १२ काडतूस विक्रीसाठी घेऊन आला होता. व्यवहार सुरू असतानाच पोलीस पथकाने धाड टाकली. यावेळी पाचही आरोपींकडून एक-एक पिस्टल जप्त करण्यात आली, तर नगरसेवक सलीम शहा याच्या दुचाकीच्या डिक्कीतून एक पिस्टल जप्त केली. सहा देशी कट्टे व १२ जिवंत काडतूस आणि एक अर्धवट जळालेले काडतूस, असा तीन लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईमुळे देशी पिस्टलची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याचे एम. राज कुमार यांनी सांगितले. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून याचा धसका गुन्हेगारी वर्र्तुळाला निश्चित बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी एसडीपीओ पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी, पीएसआय संतोष मनवर उपस्थित होते. टोळीविरोधी पथकातील ऋषी ठाकूर, संजय दुबे, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, जयंत शेंडे, श्री शिंदे यांनी केली.खरेदी पाच हजारांत, विक्री ६० हजारांतदेशी पिस्टलची निर्मिती मध्यप्रदेशात केली जाते. तेथे अतिशय कमी दरात पाच हजारात एक कट्टा मिळतो. त्याची यवतमाळात १५ ते २० हजारांत विक्री केली जाते. नंतर हे खरेदीदार हाच कट्टा ५० ते ६० हजार रुपयांत विकतात. दामदुप्पट रक्कम मिळत असल्याने यात शहरातील अनेकजण अडकले आहे. त्यांचा शोध घेतल्यास शहरातून मोठ्या प्रमाणात देशी कट्टे बाहेर निघण्याची शक्यता आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा