शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:50 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सायफळ (ता. घाटंजी) येथे वनविभाग चेक पोस्टवर नाकाबंदीदरम्यान बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करीत असताना सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सारकणीकडून येणारी बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एमएच 26 – एडी 5154) सायफळ येथील वनविभागाच्या चेक पोस्टवर तपासणीकरीता थांबविण्यात आली. यावेळी वाहनात एका पॉलेथिनमध्ये नगदी रोकड दिसून आली. याबाबत चालक प्रवीण मेश्राम (रा. दवाखाना उमरी, ता. केळापूर) याला विचारणा केली असता सदर रक्कम मालक विक्की उर्फ मनोज सिंघानिया यांची असून सारकणी येथील बनाणी सेठ यांच्याकडून लोखंडाच्या वसुलीची आणल्याचे सांगितले.मात्र याबाबत चालकाने कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. वाहनातून मिळालेल्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या 107 नोटा (2 लक्ष 14 हजार रुपये), 500 रुपयांच्या 160 नोटा (80 हजार रुपये), 200 रुपयांच्या 455 नोटा (91 हजार रुपये), 100 रुपयांच्या 2100 नोटा (2 लक्ष 10 हजार रुपये), 50 रुपयांच्या 100 नोटा (5 हजार रुपये) असे एकूण 6 लक्ष रुपये जप्त करण्यात आले. रकमेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे कलम 102 सीआरपीसीप्रमाणे जप्त करण्यात आली आहे. सदर बाब निवडणूक आयोग, आयकर विभाग, जिल्हा निवडणूक समिती यांच्याकडून खात्री करून योग्य कार्यवाही करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात घाटंजी येथील उप-कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाने केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्टवर 12 लक्ष 2 हजार 520 रुपयांचे साहित्य (इनोव्हा कार व बिअर बॉक्स) जप्त केला .

टॅग्स :Yavatmalयवतमाळ