शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजारी आईचा मुलानेच केला खलबत्त्याने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:19 IST

अर्धांगवायूने दीड वर्षांपासून बिछान्यावर खिळलेल्या वृद्ध आईचा पोटच्या पोरानेच खलबत्त्याने ठेचून खून केला. शहरातील गुरुनानक नगरात रविवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. घटना प्रत्यक्ष पाहणारी सून ओरडत घराबाहेर पडली.

ठळक मुद्देदीड वर्षापासून बिछान्यावर : आरोपीला तासाभरात अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्धांगवायूने दीड वर्षांपासून बिछान्यावर खिळलेल्या वृद्ध आईचा पोटच्या पोरानेच खलबत्त्याने ठेचून खून केला. शहरातील गुरुनानक नगरात रविवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. घटना प्रत्यक्ष पाहणारी सून ओरडत घराबाहेर पडली. मात्र मारेकरी मुलगा तंबाखू चोळत निर्विकारपणे घराबाहेर निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अवधूतवाडी पोलिसांनी तासाभरात त्याला जेरबंद केले.शांताबाई नारायण उईके (६०) रा. गुरूनानकनगर असे मृत महिलेचे नाव आहे. शांताबाई यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा कैलास (३५) विमनस्क आहे. तो फक्त घरी जेवणासाठीच येत होता. रविवारी दुपारी तो घरी आला. जेवण झाल्यावर काही वेळ तो अर्धांगवायूने बिछाण्याला खिळलेल्या आईजवळ बसला. पण अचानक त्याने लोखंडी खलबत्त्याने आईच्या डोक्यावर घाव घातले. यामुळे शांताबाई जागेवरच निपचीत पडली. हा प्रकार पाहणारी घरातील लहान सून चेतना मंगेश उईके (२५) ही आरडाओरड करत घराबाहेर पडली. त्यामुळे परिसरातील नागरिकही घराबाहेर आले. तोपर्यंत आईला ठार करणारा कैलास काहीच झाले नाही, अशा आविर्भावात बाहेर निघून गेला.या प्रकरणी चेतना उईके यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक मनोज लांडगे आणि ऋतुराज मेडवे यांनी आरोपीला पूनम चौक परिसरातून अटक केली. पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करत आहे.उईके परिवार हादरलाशांताबाई उईके यांना तीन मुले असून मोठा मुलगा मुंबईत कामाला आहे. दुसरा कैलास आणि तिसरा मंगेश आहे. लहान मुलासोबत उईके दाम्पत्य राहत होते. विनमस्क असलेला कैलास फक्त दोन वेळ घरी जेवणासाठी येत होता. सुरूवातीला काही दिवस त्याने शटर दुुरूस्तीचे काम केले. मात्र त्याचे आजारपण वाढतच गेल्याचे सांगण्यात आले. रविवारी त्याने स्वत:च्याच आईचा प्राण घेतला. या घटनेने संपूर्ण उईके परिवारच हादरलेला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी