शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात युवकावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

सचिन हराळ (३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सचिन हा त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात आला होता. सचिन पत्नीला सोडून महाविद्यालयातून बाहेर निघत असतानाच त्याच्या मागावर असलेल्या चौघांनी हल्ला केला. सचिनवर जवळून गोळी झाडण्यात आली. नंतर चाकूने वार करण्यात आले. यात सचिन गंभीर जखमी झाला. तो आरडाओरड करीत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अगदी काही क्षणात हल्लेखोर हल्ला करून पसार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात सातत्याने गंभीर घटना घडत आहे. यात उघडपणे अग्नी शस्त्राचा वापर होत आहे. कवडीपूर परिसरातील गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या आवारात एका तरुणावर चार हल्लेखोरांनी देशी बनावटीच्या पिस्टल मधून गोळीबार केला. इतकेच नव्हे तर त्याच्यावर चाकूने वार केले. ही थरारक घटना बुधवारी दुपारी घडली. सचिन हराळ (३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सचिन हा त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात आला होता. सचिन पत्नीला सोडून महाविद्यालयातून बाहेर निघत असतानाच त्याच्या मागावर असलेल्या चौघांनी हल्ला केला. सचिनवर जवळून गोळी झाडण्यात आली. नंतर चाकूने वार करण्यात आले. यात सचिन गंभीर जखमी झाला. तो आरडाओरड करीत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अगदी काही क्षणात हल्लेखोर हल्ला करून पसार झाले. मदत पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी सचिनला गंभीररीत्या जखमी केले. त्याला तातडीने पुसद ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या थरारक घटनेने पोलीसही हैराण झाले आहे. वसंतनगर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

जखमी सचिनच्याही पार्श्वभूमीची करणार पडताळणी- सचिन हराळ हा काय करतो, नेमका त्याच्यावर पाळत ठेवून हल्ला कुणी केला या घटनेमागे कोण सूत्रधार आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल होणे बाकी आहे. या थरारक घटनेमुळे मात्र पुसद शहरात पोलिसांच्या कार्यप्रणाली बद्दल संताप व्यक्त होत आहे. सातत्याने शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांना लावता आलेला नाही. यामुळे सचिन हराळ प्रकरणानंतर पोलीस आपल्या कार्यप्रणालीत बदल करतील अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी