शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या मंत्रिपदाने शिवसेना आणखी त्वेषाने वाढेल - उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:36 IST

शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यवतमाळ : मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आता शिवसेना महाराष्ट्रात अधिक त्वेषाने वाढेल, जोमाने काम करील, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेचे कट्टर टीकाकार असलेले नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे मुंबईसह कोकणातील शिवसेनेला हादरा बसेल अशा वावड्या जाणीवपूर्वक उठविल्या जात असल्याचे सांगत, प्रत्यक्षात जेव्हा-जेव्हा शिवसेनेला अशा पद्धतीने डिवचले जाते, तेव्हा शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागतो. 

हे व्हेंटिलेटर बिघडणार नाही -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले व्हेंटिलेटर बिघडणार नाही. कारण हे व्हेंटिलेटर केंद्र शासनाने पाठविलेल्या व्हेंटिलेटरप्रमाणे कामचलाऊ नाही. केंद्राने यवतमाळात पाठविलेल्या ३५ व्हेंटिलेटरपैकी केवळ २१ व्हेंटिलेटर सुरू आहेत, तर उर्वरित १४ खराब निघाले. हीच परिस्थिती केंद्राने अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविलेल्या व्हेंटिलेटरची आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणेBJPभाजपा