शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांचे अखेर मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:42 IST

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ‘मातोश्री’ला यश आले.

ठळक मुद्देशिवसेना भवनात एकत्र : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोडभावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ‘मातोश्री’ला यश आले.वाशिम व यवतमाळच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाची नियुक्ती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्याला विश्वासात न घेता परस्पर केल्याच्या मुद्यावरून खासदार भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी या नियुक्तीला थेट ‘मातोश्री’ गाठून स्थगनादेशही मिळविला होता. एवढेच नव्हे तर नंतर तार्इंनी नांदेडच्या धर्तीवर आपल्या सोईने तीन जिल्हा प्रमुखांचा पॅटर्नही लागू करून घेतला. तेव्हापासून ना. राठोड व खा. गवळी यांच्यात वितुष्ट आले. निकटवर्तीय संधीसाधू कार्यकर्त्यांच्या ‘लूज टॉक’मुळे हे वितुष्ट आणखी वाढत गेले. गेल्या एक-दीड वर्षात तर या दोन्ही नेत्यांनी एकावेळी एका व्यासपीठावर येणेही टाळले. नेत्यांच्या या भांडणात शिवसैनिकही विखुरले गेले. त्यातूनच विविध औचित्यांनी जिल्हाभर झळकणाऱ्या फलकांवरून कधी भावनाताई तर कधी संजय राठोड दिसून आले नाही. मात्र शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांची भावना ही दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, अशीच होती. काही शिवसैनिक गटातटात विखुरले असताना निष्ठावंत मात्र आमचा गट एकच शिवसेना, असे ठासून सांगत होते. मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नेत्यांमधील ही दुही पक्षासाठी हिताचे नसल्याचे हे शिवसैनिक वारंवार सांगत होते. याच दृष्टीने ‘मातोश्री’वरूनही प्रयत्न झाले. मात्र दोन-तीन बैठका व्यर्थ ठरल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ‘तार्इंना काम करू द्या, मी थांबतो’ अशी भूमिका राठोड यांनी मांडली. त्यानुसार ते वागलेसुद्धा. दरम्यान त्यांनी समाज बांधवांचा मेळावा घेऊन आपली ताकदही पक्ष व तार्इंना दाखवून दिली.नेत्यांमधील हा वाद मिटण्याची चिन्हे नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद कायम राहिल्यास पक्षाला नुकसान होण्याची, वेळप्रसंगी यवतमाळ-वाशिमची लोकसभेची जागा जाण्याची हूरहूर शिवसेना नेतृत्वाला वाटली. त्यामुळेच या नेत्यांना वाद मिटविण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला. अखेर बुधवारी शिवसेना भवनात या नेत्यांचे मनोमिलन झाले. त्यांचे एकत्र फोटोही व्हायरल करण्यात आले.मतमोजणीनंतरच होणार संभ्रम दूरज्या जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीवरून हा वाद उफाळला होता तेसुद्धा या मनोमिलनाचे साक्षीदार बनले. शिवसेना भवनातील एकत्र फोटोवरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद मिटल्याचे दिसत आहे. मात्र त्यांच्यात मनभेद कायम तर नाही ना, अशी हूरहूर शिवसैनिकांमध्ये कायम आहे. हे मतभेद खरोखरच मिटले की नाही हे मात्र लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, एवढे निश्चित.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीSanjay Rathodसंजय राठोड