शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा

By सुरेंद्र राऊत | Updated: November 13, 2023 18:12 IST

तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारचा नोंदवला निषेध

यवतमाळ : राज्य व केंद्र सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. फसवे अभियान राबवित आहे. जिल्ह्यासह संपर्ण राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. साडेचार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ५९ हजारजणांना पीक विम्याचा लाभ मिळाला. याचाही गवगवा स्थानिक पालकमंत्री करीत आहे. शासनाच्या नार्केतेपणाचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी निषेध आंदोलन केले. त्यांनी शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी, शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध केला.

शासनाचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी काळी दिवाळी साजरी केली. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजना व घोषणा फसव्या निघाल्या. आज शेतकरी अतिवृष्टीचा सामना करून बेजार झाला आहे. नापिकीचे वर्ष असतानाही जिल्ह्याची पीक आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक काढण्यात आली आहे. सोयाबीन, कापूस या पिकाचे उत्पन्नच हाती आले नाही व दुसरीकडे हक्काच्या पीक विम्याचा लाभही मिळाला नाही. प्रचंड लागवड खर्च येऊन आता शेतमालाला बाजारात भाव नाही. शासन हमी दर देण्यास तयार नाही. केवळ शासन आपल्या दारीचा देखावा करीत जनतेच्या पैशाची उधळपट्टी स्वत:च्या प्रचार, प्रसिद्धीवर करीत आहे. अशा प्रकारचा आरोप या आंदोलनातून करण्यात आला. यावेळी शेतकरी बबनराव घुले यांनी आपल्या व्यथा मांडत दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खावून शासनाचा निषेध केला. जिल्हा प्रमुख कल्पना दरवई यांनी आंदोलन स्थळी झुणका भाकर व ठेचा तयार केला. या आंदोलनात जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, प्रवीण शिंदे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, अतुल गुल्हाने, विनोद पवार, गजानन पाटील, संजय कोल्हे, चंद्रकांत उडाखे, संदीप सरोदे, सिकंदर शाह, राजीक खान, ॲड. श्रीकांत माकोडे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीDiwaliदिवाळी 2023Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनYavatmalयवतमाळ