शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वाघाडी जांब येथे शिवसैनिकाचा भोसकून खून; आरोपी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 17:12 IST

एक संशयित ताब्यात : यवतमाळनजीक वाघाडीत थरार

यवतमाळ : दिवाळीच्या सुट्या, त्यात क्रिकेट वर्ल्ड कपचे सेमी फायनल असा सर्व माहोल असताना शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. जागेवरच त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

योगेश काटपेलवार (३९) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, हा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याेगेशचा मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. शिवाय घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या एका संशयितासह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यातील मुख्य मारेकरी चापडोह येथील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

चापडोह येथे राहणाऱ्या महेश नामक युवकाने इतर साथीदारांना सोबत घेऊन हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात वृत्त लिहिस्तोवर तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. यापूर्वीच पोलिसांनी खबऱ्यांमार्फत माहिती गोळा करणे, संशयितांची विचारपूस करणे याला सुरुवात केली होती. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय पुज्ज़लवार, ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुणकलवार, सहायक निरीक्षक राहुल शेजव आदींनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ