शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतला बंद

By admin | Updated: August 3, 2014 23:37 IST

शतकाचा इतिहास असलेली आणि सर्वसामान्यांचा गरीबरथ ठरलेली शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. क्लिक अ‍ॅन्ड निक्सन कंपनीसोबत असलेला करार संपल्याने शकुंतला यवतमाळकरांवर रुसली आहे.

करार संपला : रेल्वे प्रशासनाने लावली सूचना, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष रूपेश उत्तरवार - यवतमाळ शतकाचा इतिहास असलेली आणि सर्वसामान्यांचा गरीबरथ ठरलेली शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. क्लिक अ‍ॅन्ड निक्सन कंपनीसोबत असलेला करार संपल्याने शकुंतला यवतमाळकरांवर रुसली आहे. गतवर्षीही शकुंतला बंद झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आणि शकुंतला धावायला लागली. मात्र आता दहा दिवस झाले तरी कोणत्याही लोकप्रतिनिधीने अद्यापपर्यंत आवाज उठविला नाही. ब्रिटीश काळापासून यवतमाळ ते मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेला लोकांनी प्रेमाने शकुंतला हे नाव दिले. वऱ्हाडात पिकणारे पांढरे सोने इंग्लडमध्ये घेऊन जाण्यासाठी १९१२ मध्ये क्लिक अ‍ॅन्ड निक्सन कंपनीने रेल्वे सुरू केली. यासाठी ब्रिटीश कंपनीने १०० वर्षाचा करार केला होता. त्यावेळी एका दिवसाला एक हजार रुपये किंवा महिन्याला २५ हजार रुपये यावर खर्च करण्याचा करारही झाला होता. यवतमाळ ते मूर्तीजापूर हा ११३ किलोमीटरचा नॅरोगेज लोहमार्ग आहे. आजतागायत शकुंतला यवतमाळ ते मूर्तीजापूर दिवसातून एकदा आपल्याच डौलाने धावत होती. मात्र २४ जुलैपासून शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. तशी सूचना यवतमाळच्या रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे. १०० वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या या लोहमार्गाची गत ६० वर्षात कोणतीही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे हा मार्ग आता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळेच रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच आर्थिक कारणही पुढे केले जात आहे. गतवर्षी शकुंतला बंद झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. आंदोलन केले. त्यानंतर शकुंतला पुन्हा धावायला लागली. रेल्वे सुरू करण्यासाठी लोहमार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परंतु लागणारा पैसा आणायचा कोठून असा प्रश्न आहे.