लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील चातारी ग्रामपंचायतीविरुद्ध १ सप्टेंबरपासून प्रणव पवार यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची शनिवारी दुसºया दिवशी सांगता झाली.चातारी गावात खड्डेयुक्त रस्त्यांची डागडुजी झाली नाही. तुंबलेल्या नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. लेखी सूचना देऊनही या समस्यांची दखल न घेतल्याने पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होऊन ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ प्रणव पवार यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले होते. चातारीचे माजी सरपंच तथा वसंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक कल्याणराव माने यांच्या हस्ते शनिवारी निंबू शरबत देवून उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायतीने आवश्यक तेथे तत्काळ रस्ते दुुरुस्ती करून नाल्यांची सफाई करण्याची ग्वाही दिली. तसे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी अरविंद माने, सरपंच भगवान माने, विलास माने, ग्रामविकास अधिकारी डी.सी. सुरोसे, जमादार गणेश राठोड, गावंडे, अविनाश माने, राजेश कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चातारीत उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:51 IST
तालुक्यातील चातारी ग्रामपंचायतीविरुद्ध १ सप्टेंबरपासून प्रणव पवार यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची शनिवारी दुसºया दिवशी सांगता झाली.
चातारीत उपोषणाची सांगता
ठळक मुद्देचातारी ग्रामपंचायतीविरुद्ध १ सप्टेंबरपासून प्रणव पवार यांनी उपोषण सुरू केले.