शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षकांचा पगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

यवतमाळ : वडील इंडियन रेल्वेत ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत होते. अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना डीवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली. मुलाने ...

ठळक मुद्देइंजिनिअर ते जिल्हा पोलीस अधीक्षक पदापर्यंतच्या प्रवासात वडील व विज्ञान शिक्षकाच्या मार्गदर्शनाचा ठसा

यवतमाळ : वडील इंडियन रेल्वेत ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत होते. अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना डीवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली. मुलाने नोकरीची सुरुवातच अव्वल दर्जाच्या पदावरून करावी असा त्यांचा मानस होता. मद्रास ख्रिस्तीयाना माध्यमिक विद्यालयात असताना विज्ञान शिक्षक पी.विश्वनाथन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजही मित्रात बसलो की पी.व्ही. सरांची आठवण हमखास निघते. एसपी झाल्यानंतर त्यांची भेट घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अद्यापपर्यंत यात यश आलेले नाही. त्यानंतर यूपीएससीच्या तयारीकरिता गणेश सुब्रमण्यम यांचे मार्गदर्शन लाभल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.वडिलांच्या कामाची पद्धत हीच माझी प्रेरणाविज्ञान शिक्षक आवडते असल्याने साहजिकच विज्ञान विषयात रुची निर्माण झाली. पी. विश्वनाथ सर अतिशय सोप्या पद्धतीने शिकवून सिलॅबस वेळेत पूर्ण करीत होते. तर यूपीएससीची तयारी करण्यासाठी दाखल झालेल्या अ‍ॅकेडमीतील शिक्षक गणेश सुब्रमण्यम यांनी त्यांच्या वाट्याला आलेले यूपीएससीतील अपयश यातूनच विद्यार्थ्यांकरिता यशाचा मार्ग तयार केला. वडिलांचे दैनंदिन जीवन एक प्रेरणादायी वाट होती. त्यांची स्वत:हून काम करण्याची व त्यातून इतरांना कामासाठी प्रोत्साहित करण्याची कला आजही स्मरणात आहे. किंबहुना त्याचाच अवलंब करून माझी वाटचाल सुरू आहे. आज शिक्षकदिनी त्यांना वंदन...!वडिलांनीच दिला करिअर निवडण्याचा चॉईस..इलेक्ट्रीक्लस अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉबही मिळाला होता. मात्र तेथे मन लागत नव्हते. तेव्हा वडिलांकडे शिक्षणासाठी दोन वर्षे मागितली. यावर वडिलांनी ‘तुझ्या मुलाने तुला असा प्रश्न केला असता तर तू काय निर्णय घेतला असता?’ असा प्रतिप्रश्न केला व दोन वर्षे यूपीएससीच्या तयारीची परवानगी दिली. वडिलांचे दैनंदिन जीवन हेचमाझ्यासाठी गुरुकिल्ली होते. रेल्वेत नोकरीला असतानाही सहकाऱ्यांना घेऊन ते काम करीत होते. आपल्या अधिनस्त असलेल्या कनिष्ठांचाही आदर करण्याचा गुण त्यांच्याकडून मिळाला. कोणते काम करून घेताना रट्टा मारण्याऐवजी समोरच्यांना प्रोत्साहित केल्यास त्या कामाचा आनंद करणाऱ्याला व करून घेणाऱ्याला मिळतो. यातून एक स्वयंस्फूर्तीने काम करणारी टीम तयार करता येते. वडील मेघनाथ यांनी शिकविण्यापेक्षा कृतीचा आदर्श ठेवून मला घडविले. हाच मार्ग प्रशासकीय अधिकारी म्हणून मी कामात अवलंबितो.गुरुचे अपयश ठरले ‘सक्सेस की’...सिव्हील सर्व्हिस कोचिंग क्लासेस चालविणारे शिक्षक गणेश सुब्रमण्यम यांचे अपयश आमच्यासाठी ‘सक्सेस की’ ठरली. त्यांच्या अ‍ॅकेडमीत प्रवेश घेताच त्यांनी कोणत्या चुका करायच्या नाही हे परिमाण स्वत:च्या अनुभवातून तयार केले. त्याच चुकांना टाळत मी यूपीएससीची तयारी केली व दोन वर्षानंतर आत्मविश्वासाने आयपीएस म्हणून सेवेत आलो.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन