शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

वणीवर ‘स्क्रब टायफस’चे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:02 IST

वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअस्वच्छतेचा विळखा : आजाराच्या जीवाणंूचे गवतात वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वणी शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य असून केवळ स्क्रब टायफसच नाही, तर डेंग्यू, मलेरियासारखा आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच स्क्रब टायफसने एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरवर्षीच पावसाळ्यात वणी शहरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. यंदा मात्र ‘स्क्रब टायफस’ने वणी शहरात शिरकाव केल्याने सामान्य माणसांसह आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली आहे. या आजारापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्वरित उपचार करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मागील दोन वर्षांत स्वॉईन फ्ल्यू या आजाराची अनेकांना बाधा झाली होती. त्यात काहींचा मृत्यूही झाला होता. आता स्क्रब टायफसने वणीत वृद्ध महिलेचा बळी घेतल्याने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अच्छता आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे आहेत. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागृती नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात अनेक ठिकाणी मोकळी मैदाने आहेत. त्या ठिकाणी गवतासह अन्य झुडपेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे स्क्रब टायफस आजाराच्या जिवाणूंचा धोका वाढला आहे.विशेष म्हणजे स्क्रब टायफसचे जिवाणू गवतामध्ये आढळून येतात. या जिवाणूचा डंख झाल्यानंतर त्याचे विष हळूवार शरिरात पसरते. त्यानंतर शरिरातील प्रतिकार शक्ती कमी होऊन एक-एक अवयव निकामी होऊ लागतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास प्रसंगी रुग्ण दगावतो.वणी तालुक्यात यापूर्वीही आढळले होते रुग्णयापूर्वीदेखील वणी तालुक्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले होते. मात्र योग्य उपचार मिळाल्याने ते या आजारातून बरे झालेत, अशी माहिती येथील डॉ.गणेश लिमजे यांनी ‘लोकमत’ला दिली. नागरिकांनी या विषयात जागृत राहून परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्य