शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

उमरखेड येथे स्काऊट-गाईड मेळावा

By admin | Updated: January 23, 2017 01:11 IST

तंबाखूमुक्तीची घोषणा : १४ कब व १८ बुलबुल पथकांचा सहभाग

तंबाखूमुक्तीची घोषणा : १४ कब व १८ बुलबुल पथकांचा सहभाग उमरखेड : तालुकास्तरीय भारत स्काऊट गाईडचा मेळावा येथील मनोहरराव नाईक फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या मेळाव्यात १४ कब व १८ बुलबुल पथकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले. या मेळाव्याला प्रारंभ कब-बुलबुलच्या पथकाने जंगी आरोळी व बडी सलामी देऊन करण्यातआला. यावेळी उमरखेडचे गटशिक्षणाधिकारी पी.एम. दुधे, शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद सोनटक्के, विस्तार अधिकारी पी.आर. खांडरे, मेळावा समन्वयक टी.एफ. यमजलवार, केंद्र प्रमुख संतोष घुगे, शंकर शिराळे, गणपत कुंबलवाड, मारोती ढगे, अ. रज्जाक, तंबाखु मुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक अवधूत वानखेडे, उत्तमराव दळवी, भारत कुळकर्णी, नारायण चव्हाण, गणेश कदम, राजू देशमुख, कृष्णराव पाचकोरे, पुष्पा चंद्रवंशी, सरोजना कर्णेवाड, प्राचार्य तिवारी, गिरीष देशमुख उपस्थित होते. या मेळाव्यात कब विभागातून उमरखेड येथील साकळे विद्यालय प्रथम, नागापूर शाळाद्वितीय आणि बाळदी शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. बुलबुल विभागातून नागापूर शाळा प्रथम, चातारी येथील कन्या शाळा द्वितीय आणि सुकळीच्या शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. या मेळाव्यात साहसी खेळांचे प्रात्यक्षिक, कोपरा सजावट, हस्तकला, चित्रकला व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या मेळाव्यात तंबाखू मुक्तीची अनेकांनी घोषणा केली. चिल्ली येथील स्काऊट पथकाने नियोजनात मोलाची भूमिका पार पाडली. स्काऊट गाईडच्या या मेळाव्याने तालुक्यात उत्साह संचारला होता. समारोपीय कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)