शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

सामाजिक सुधारणांसाठी विज्ञान विकसित केले पाहिजे

By admin | Updated: April 12, 2015 00:01 IST

मंगळावर यशस्वीपणे यान पाठविण्याइतपत प्रगती भारताने केली आहे.

बेजवाडा विल्सन : ‘समता पर्वात’ बहुजनांच्या हक्कावर मार्गदर्शनकाशीनाथ लाहोरे  यवतमाळमंगळावर यशस्वीपणे यान पाठविण्याइतपत प्रगती भारताने केली आहे. इतरही क्षेत्रात नेत्रदीपक प्रगतीचा आलेख वाढत आहे. असे असताना आजही जाती व्यवस्थेमुळे काही कामांसाठी विशिष्ठ वर्गालाच गृहीत धरले जाते. मानवी मलमूत्राची विल्हेवाट आजही माणसांकडून करून घेतली जाते. माणुसकीला काळिमा असणाऱ्या या कामाच्या पद्धतीत बदल करावा, असे प्रस्थापितांना वाटतच नाही. आत्मसन्मानाने जगण्याची संधी सर्वांना दिली पाहिजे. भारतीय घटनेने ती दिली असली तरी भारतातील अनेक कायदे हे केवळ कागदावरच आहे. सफाईचे काम कोणीही खुशीने करीत नाही, असे प्रतिपादन मानवी हक्क आंदोलन तथा सफाई कामगार आंदोलनाचे नेते बेजवाडा विल्सन (दिल्ली) यांनी केले. महात्मा फुले-डॉ. आंबेडकर समता पर्वात राजर्षी शाहू महाराज समता परिसरात पहिल्या समता विचारवेध सत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चोथरीराम यादव (बनारस), नरेंद्र फुलझेले, ज्ञानेश्वर गोबरे, मायाताई गोबरे, मंगला दिघाडे, दीपक नगराळे, मधुकर भैसारे, मन्सूर एजाज जोश आदी विचारपीठावर उपस्थित होते. प्रा. चोथरीराम यादव म्हणाले, हजारो वर्षांपासूनच्या सवर्णांच्या गुलामगिरीतून मुक्त होणे हा बहुजनांचा जन्मसिद्ध हक्क आहे. अघोषित आरक्षणाचा लाभ सवर्णांनी हजारो वर्षांपासून घेतला आहे. एकविसावे शतक हे फुले-आंबेडकरांचे शतक असून फुलेंच्या सत्यशोधक विचारधारेचा प्रवाह म्हणजे समता पर्व आहे. डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, सफाई कामगारांसाठीचा कायदा बनविण्यात बेजवाडा विल्सन यांचा मोठा सहभाग आहे. अधिकाराच्या पदावर असल्याने मला त्यांचे काम पुढे रेटता आले एवढेच. यापुढे रेल्वेच्या डब्यांना जैविक शौचालय लावले जाणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. ‘क्षण एक गौरवाचा’ या मालेत बेजवाडा यांचा सन्मान अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. चाथरीराम यांनाही सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी यवतमाळातील स्त्री-पुरुष सफाई कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद भगत यांनी त्यांचा परिचय करून दिला. विनोद बुरबुरे यांनी संपादित केलेल्या ‘समता पर्व’ या साप्ताहिकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. समता पर्वाच्या वेबसाईटचेही लोकार्पण करण्यात आले. समता पर्व, स्मृतिपर्वाच्या धर्तीवर नवरात्रात युवापर्व घेण्याची संकल्पना यावेळी अध्यक्षांनी मांडली. संचालन अंकुश वाकडे यांनी केले.