शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शाळांचा प्रारंभ, पण विद्यार्थ्यांनाच नो-एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

२८ जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकराव्या वर्गाच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर दहावी आणि बाराव्या वर्गाच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित रहावे लागणार आहे. परंतु विद्यार्थ्याविना सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव टळणार आहे. 

ठळक मुद्देनवे शैक्षणिक सत्र : शिक्षक शाळेत येऊन ऑनलाईन शिकविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शैक्षणिक वर्ष बदलले. आता सोमवारपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक शाळांचे दार उघडणार असले तरी नव्या सत्राची सुरुवात मात्र विद्यार्थ्यांविना होणार आहे. केवळ शिक्षकांची शाळेत उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. २८ जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकराव्या वर्गाच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर दहावी आणि बाराव्या वर्गाच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित रहावे लागणार आहे. परंतु विद्यार्थ्याविना सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव टळणार आहे. 

मागच्या वर्षाच्या अभ्यासाची उजळणी करणार n सोमवारपासून शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या राहिलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने निर्माण केलेल्या ऑनलाईन ब्रीज कोर्सचे सोमवारी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे मागील वर्षी झालेले अभ्यासाचे नुकसान भरून निघणार आहे.  

जिल्हा परिषद शाळांप्रमाणेच नगरपरिषदेच्या शाळांमध्येही ऑनलाईनच शिकविले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या. मात्र या पद्धतीमध्ये गोरगरीब तसेच मागासगर्वीय घटकातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची शासनाने काळजी घेतली पाहिजे. सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना सुविधा द्याव्या. आम्ही मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेत सॅनिटायझर व अन्य तयारी पूर्ण केली आहे. अध्यापनही करू.    - राजेंद्र वाघमारेविभागीय अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना 

सध्या सर्वच शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही शाळा ऑफलाईन विद्यार्थ्यांना बोलविणार नाही. मात्र शिक्षक शाळेत जावून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, इच्छुकांना टीसी देणे, पुस्तक वाटप, वृक्षारोपण, सॅनिटायझेशन व अध्यापन ही कामे करतील. नवी पुस्तके उशिरा येणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडील जुनी पुस्तके आपआपसात वाटून देण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.     - प्रमोद सूर्यवंशीशिक्षणाधिकारी, यवतमाळ  

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या