शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शाळा पुन्हा झाल्या ‘जिवंत’; पाखरांचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दोन वर्षांपासून पोरांविना पोरक्या आणि ओक्याबोक्या भासणाऱ्या शाळा बुधवारी पहिल्यांदाच पुन्हा गजबजल्या. पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाल्याने बुधवारी दिवसभर या शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा उत्साहात सुरू झाल्या तर यवतमाळ शहरातील काही शाळांनी आणखी काही दिवस ‘थांबण्याची’ भूमिका घेतली. विशेषत: जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या सर्वच शाळा सुरू झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, दीपक चवणे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, योगेश डाफ यासह शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांनी सकाळपासून शाळा भेटी सुरू केल्या. सीईओंनी तर पहूर नस्करी येथील विद्यार्थ्यांची वाचन परीक्षा घेऊन बक्षिसेही दिली.

गणवेशासाठी आले साडेचार कोटी रुपये 

- बुधवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने विविध शाळांमध्ये पहिल्या, दुसरीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. - पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. गणवेशासाठी जिल्ह्यात चार कोटी ६२ लाख दहा हजार २०० रुपयांचा निधी आला आहे. यातून ९० हजार ७८२ मुली अनुसूचित जातीची दहा हजार २४९ मुले, अनुसूचित जमातीची २० हजार ८६० मुले आणि बीपीएलमधील ३२ हजार १४३ मुलांना गणवेश मिळणार आहे. - अकोलाबाजार, तरोडा, पहूर नस्करी येथील शाळांमध्ये सीईओ श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, बीडीओ जयश्री वाघमारे, बीईओ किशोर रावते, डाॅ. श्याम शिंदे, केंद्र प्रमुख राजू परमार, सरपंच अतुल देठे, विलास खरतडे, दिलीप शिंदे, सुनील देवतळे, सतीश मुस्कंदे, बबीता बारले, राधा जाधव, आसाराम चव्हाण यांनी वृक्षारोपण केले. वडसद येथे मिरवणूक निघाली. 

शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह 

- कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट सध्या भीती पसरवित असला तरी बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात एन्ट्री केली. शिक्षण विभागानेही त्यांचे तेवढ्याच आत्मीयतेने स्वागत केले. उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले होते. विविध पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शाळा भेटी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.       - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी 

नगरपालिकांच्या शाळेतही विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी शालेय साहित्य वाटपासोबत विद्यार्थ्यांचे तापमानही तपासण्यात आले. - राजेंद्र वाघमारेमुख्याध्यापक, दिग्रस 

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू झाल्याने शिक्षक आणि पालकही सुखावले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वांनी बुधवारी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. - गजानन पोयामशिक्षक, दाभा 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या